Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - २५००० कोव्हीशील्ड चे डोस अहमदनगर ला प्राप्त

No comments

 News24सह्याद्री २५००० कोव्हीशील्ड चे डोस अहमदनगर ला प्राप्त..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


१. ऑक्सिजन प्लांट परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश
अहमदनगर शहरातील एम आय डी सी  परिसरातील ऑक्सिजन प्लांट वर ३० एप्रिल पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचे आदेश दिले आहेत . ऑक्सिजन प्लान्टवर सध्या शहरातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी होतेय .. यातूनच अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याने आता सर्व ऑक्सिजन प्लांट परिसरामध्ये  जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत तसेच याठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

२. २५००० कोव्हीशील्ड चे डोस अहमदनगर ला प्राप्त
गेल्या ४ दिवसांपासून नगर जिल्ह्याला  कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा होत नव्हता  . शनिवारी रात्री २५००० कोव्हीशील्ड चे डोस अहमदनगर ला प्राप्त झाले आहेत.रविवारी या लसींचे वाटप झाले असून नगर शहरासह जवळच्या तालुक्यात रविवारी हि लसीकरण सुरु राहू शकते अशी माहिती आरोग्य विभागाने दिलीये.

३. कामावरील उपस्थिती १५ टक्के करण्याचे राज्य सरकारचे आदेश
राज्यभरात कडक लोकडाऊन सुरु असल्याने... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये १५ टक्के उपस्थितीत कर्मचारी काम करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा परिषदेनेही अनेक प्रशासकीय कामे ऑनलाईन करण्यावर भर दिलाय . प्रत्येक विभागातील उपस्थिती १५ टक्के करण्याबाबतच्या सूचना राज्य सरकारनी दिल्या होत्या त्यानुसार हि कपात करण्यात आलीये.

४. भाजीबाजार बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भाजी बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले असतानादेखील ..नगर- मनमाड माहार्गावरील एम आय डी सी येथील सह्याद्री चौकात मोठ्या प्रमाणात बाजार भरत आहे.भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येतेय तसेच अनेक लोक मास्क न लावता फिरत असल्याचे दिसून येत आहे.

५. कत्तलखान्यावर छापा टाकून २५ गोवंश जनावरांची सुटका
नगर शहरातील  कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी  25 गोवंश जनावरांची सुटका केली आहे. शहर विभागाचे डिवायएसपी विशाल ढुमे यांच्या पथकातल्या पोलिसांनी ही कारवाई केलीय. अहमदनगर शहरातल्या झेंडीगेट परिसरात ही कारवाई करण्यात आली असून  या कारवाईमध्ये पोलिसांनी जनावरांसह काही मांस  जप्त केलय. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *