Breaking News

1/breakingnews/recent

१ एप्रिल सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - जिल्ह्यातील पोलिसांमध्ये अकोला पोलिस प्रथम क्रमांकावर...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES


1. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर  तहसीलदारांची कार्यवाही
शिरपूर तालुक्यातील वणावल जातोडा रस्त्यावर अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्वतः तहसीलदार यांनी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पकडले असून दंडात्मक कार्यवाहीसाठी हा ट्रॅक्टर  प्रांताधिकारी कार्यालयात जमा केलाय तर  सदरची  कार्यवाही एका गोपनीय माहिती वरून करण्यात आली.

2. नगर परिषद च्या कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध
हिंगोली येथील नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करत  काळ्या फिती लावून आज कामकाज करण्यात आले. 

3. जिल्ह्यातील पोलिसांमध्ये अकोला पोलिस प्रथम क्रमांकावर  
 राज्यात पोलिस आयुक्तालय तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांचे कामकाज कशाप्रकारे आहेय.यासाठी करण्यात आलेल्या मुल्यांकनामध्ये अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील पोलिसांमध्ये अकोला पोलिस प्रथम क्रमांकावर आलाय.

4. शिक्षक संघाचे सरचिटणीस योगेश सनेर यांच्या घणाघात
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी एकशे अकरावी सर्वसाधारण ऑनलाईन सभेत सभासदांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात न आल्याने सभासदांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे .

5. वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल कृष्णा कारखान्याकडून अदा
डाळे विभागातील अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम अनेक काळ थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृष्णा कारखान्याने पुढाकार घेत, थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला होता. 

6. साताऱ्यात उदयनराजेंना धक्का
बहुचर्चित असलेला साताऱ्यातील आणेवाडी टोलनाका व खेड शिवपूरचा टोलनाका हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून काढून घेत शिवसेना व राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन तारखेपासून मॅनेजमेंट बदलणार असल्याने आणेवाडी टोलनाक्यावर आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. 

7. अँटीजेन टेस्ट केली तरच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश
 नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत अँटीजेन टेस्ट केल्याशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई परिसरातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असून एपीएमसी मार्केटमधील  संचालक,सचिव आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

8. राजेश टोपे यांचं महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात मोठं वक्तव्य
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून लाॅकडाऊनचे संकेत दिले होते, पण आता त्यांनी महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

9. सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला दिले शरद पवारांचे नाव
कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्री पर्वतरांगेत नव्या वनस्पतीचा शोध लावला. या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राजकारणातील सह्याद्री अशी ओळख असलेल्या शरद पवार यांचे नाव समर्पित करण्यात आले आहे.

10. महामानव चेन्नईत पोहोचला
आयपीएल 2021 ला काही दिवसच शिल्लक राहिले असून सर्व संघांनी तयार सुरू केली आहे. आयपीएलचा पहिला सामना गटविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघात आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *