Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - बॉलिवूडकडून ना कौतुकाची थाप, ना चर्चा

No comments

  News24सह्याद्री बॉलिवूडकडून ना कौतुकाची थाप, ना चर्चा..पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES


१. बॉलिवूडकडून ना कौतुकाची थाप, ना चर्चा
२. युजरच्या कमेंटवर भडकली मानसी नाईक,
३ तेजस्विनी पंडितच्या 'संवेदनशील' पोस्टवर कौतुकाचा वर्षाव !
४. उगाच फालतूमध्ये महान बनण्याचा प्रयत्न का करतोयस? नवाजुद्दीनला लहान भाऊ
५. थलायवी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याबाबत कंगना नाराज

२. बॉलिवूडकडून ना कौतुकाची थाप, ना चर्चा; रणदीप हुड्डा म्हणाला, आता मला सवय झालीये
अभिनेता रणदीप हुड्डाच्या  'एक्सट्रॅक्शन'  या हॉलिवूड सिनेमाची चर्चा खूप झाली. या सिनेमात रणदीपने हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ सोबत स्क्रिन शेअर करताना दिसला. या सिनेमातील रणदीपच्या अभिनयाचे चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले. पण बॉलिवूडच्या सहकलाकारांच्या तोंडून मात्र कौतुकाचा एक शब्दही रणदीपला ऐकायला मिळाला नाही. आता रणदीपने यावर प्रतिक्रिया दिलीय.तो म्हणाला, 'इंडस्ट्रीतील लोकांमध्ये सिनेमावरून चर्चा होतात. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. 

3. युजरच्या कमेंटवर भडकली मानसी नाईक, कमेंट करताना आता दोन वेळा विचार करतील
''वाट बघतोय रिक्षावाला'' या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मानसी नाईक. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या खासगी आणि पर्सनल आयुष्यातील प्रत्येक घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नुकतेच एका युजरने अतिशय असभ्य कमेंट तिच्या फोटोवर केली. ही कमेंट पाहून मानसी नाईकचाही चांगलाच संताप झाला. 

३. मी अभिमानाने आरशात बघते... तेजस्विनी पंडितच्या 'संवेदनशील' पोस्टवर कौतुकाचा वर्षाव !
भारतात सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. अनेक रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा परिस्थितीत आता मराठी कलाकार-  कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने रक्तदान केलेय  आणि इतरांनाही रक्दान करण्याचे आवाहन केलं आहे. रक्तदान करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

४. उगाच फालतूमध्ये महान बनण्याचा प्रयत्न का करतोयस? नवाजुद्दीनला लहान भावानेच सुनावलं
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अलीकडे बॉलिवूड सेलिब्रिटींचा चांगलाच क्लास घेतला होता. कोरोनाकाळात मालदीवमधील सुट्टीचे फोटो शेअर करणा-या सेलिब्रिटींवर नवाज भडकला होता. "लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाही आणि तुम्ही पैसे उधळत आहात, अरे जरा तरी लाज बाळगा, असे तो म्हणाला होता.'' पण कदाचित नवाजचा हा संताप त्याचा लहान भाऊ शमास  सिद्दीकीला आवडला नाही.! त्याने काय केले तर सोशल मीडियावर पोस्ट करत नवाजलाच सुनावले. 

५. थलायवी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याबाबत कंगना नाराज
कंगनाचा 'थलायवी' खूप चर्चेत आहे. अलीकडेच या सिनेमाचे ट्रेलर देखील रिलीज झाले आहे. 'थलायवी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे अलीकडेच घोषित केले गेले आणि त्यावर कंगनाने आपली नाराजी व्यक्‍त केली आहे. 'थलायवी' 23 एप्रिलला रिलीज केला जाणार होता. मात्र निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र अलीकडे समजलेल्या माहितीनुसार आता 'थलायवी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. यावर कंगनाने एक पोस्ट टाकली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *