Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नियम तोडणाऱ्यांकडून लाखांचा दंड वसूल

No comments

    News24सह्याद्री -




TOP HEADLINES

1. कोरोनाने छळले मरणानंतरही सुटका नाही
दिवसेंदिवस कोरणा चा प्रादुर्भाव वाढत असताना मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील 24 तासात प्रशासनाकडून 21 मृत्यूंची नोंद झाली आहे. तरी प्रत्यक्षात अमरधाम स्मशानभूमीत मात्र बुधवारी 65 मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उशिरा अंत्यविधीसाठी जागा ही शिल्लक न राहिल्याने अंत्यसंस्कार थांबविण्याची वेळ आली होतो. कोरोनाने, छळले होते, मृत्यूनंतरही सुटका नाही.

2. शहरात तीन नवे कंटेनमेंट झोन जाहीर
मनपाने आणखीन तीन कंटेनमेंट घेऊन जाहीर केले आहेत या भागात तीन मे पर्यंत निर्बंध लागू झाले आहेत गुलमोहर रोड आनंद नगर येथील अल्ट्राटेक ऑफिस ते खाबिया बंगला, बुरुडगाव रोडवरील भोसले आखाडा येथील पूर्वेस आक्रो गोडाऊन, दक्षिणेस महावीर स्काय प्रोजेक्ट, पश्चिमेस चंदन इस्टेट समोरील जागा, भोसले यांच्या घरा समोरील रस्ता उत्तरेस काळे गल्ली, भांबळ गल्ली, नूतन ब्युटी पार्लर ते बुरुडगाव रोड, लालटाकी देशमुखवाडी परिसरातील पूर्वेस सिलाई वल्डच्या पाठीमागील भाग, उत्तरेस अमरदीप अपार्टमेंट समोरील रस्ता, पश्चिमेला नाला दक्षिणेस खंडेलवाल यांच्या बंगला आदी भागात निर्बंध लागू केले आहेत.

3. नियम तोडणाऱ्यांकडून 28 लाखांचा दंड वसूल
कोरोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाची पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू असून मागील चौदा दिवसात जिल्ह्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा हजार 53 जणांवर पोलिसांनी कारवाई करत 28 लाख 9 हजार 900 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

4. मनपा कर्मचाऱ्यांना रेमडेसिविर राखीव ठेवाव्या.
खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी अहमदनगर साठी आणलेल्या 300 रेमडेसिविर मधून 50 इंजेक्शन महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी कामगार संघटना महासंघाचे कॉम्रेड भैरवनाथ वाकळे आणि डॉक्टर मेहमूद सय्यद यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

5. गर्दी हटेना, कोरोना साखळी तुटेना...
पुरणाचा वाढता प्रादुर्भाव पाहूनही शहरातील गर्दी कमी होईना पाईपलाईन रस्ता, चितळे रस्त्यावर भाजी तर डाळ मंडईत किराणा तर भुसार बाजारात धान्य खरेदीसाठी होणारी गर्दी काही केल्या हटेना. त्यामुळे शहरातील कोरोनाची साखळी तोडणे अवघड झाला आहे. शहरात जनता कर्फ्यू आहे.सकाळी सात ते अकरा या कालावधीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी परवानगी आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *