Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - अभिनेत्री रुचिता जाधव अडकणार लग्नबंधनात

No comments

 News24सह्याद्री अभिनेत्री रुचिता जाधव अडकणार लग्नबंधनात..पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES

1. करीनाने शेअर केला दुसऱ्या बाळाचा फोटो
करीना दुसऱ्यांदा आई झाल्यापासून तिच्या दुसऱ्या बाळाला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक होते.अखेर करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या दुसऱ्या बाळाचा एक गोड फोटो शेअर केलाय. यात सैफ अली खान आणि तैमूर त्यांच्या कुटुंबातील नव्या पाहुण्यासोबत खेळताना दिसत आहेत. 

२. सोनू सूदवर लोकांची सडकून टीका
गरजूंचा देवदूत ठरलेला  बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद सतत काहीना काही कारणाने चर्चेत असतो. आता चक्क सोनू सूद याने विद्यार्थ्यांसाठी सायकल चालवली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्यानंतर आणि पुढे ढकलल्यानंतर त्याने  हे काम केलंय. मात्र या सायकल राईडबद्दल सोनू सूदचे काही प्रमाणात कौतुक होतंय मात्र त्याहून अधिक  जास्त त्याला ट्रोल केल जात आहे.

३. अभिनेत्री रुचिता जाधव अडकणार लग्नबंधनात
सध्या अनेक कलाकार हे लग्न बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अस्ताद काळे, अभिज्ञा भावे यांच्या पाठोपाठ आता ‘लव्ह लग्न लोचा’मधील अभिनेत्री रुचिता ३ मे ला लग्न करणार आहे. ती मुंबईतील व्यावसायिक आनंद मानेशी लग्न करणार आहे. 

४. इंडियन आयडॉलवरही कोरोनाचं संकट
प्रसिद्ध सिंगिंग शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या  सेटवरून आता आणखी एक महत्वाची  माहिती समोर आली आहे. नुकताच या शोचा एक स्पर्धक पवनदीप राजन  हा कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. आता आणखी एक स्पर्धक आशिष कुलकर्णी याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

५. लेकीच्या आठवणींनी गायिका चित्रा वाघ  हळहळल्या
कहना ही क्या ये नैन अंजान से जो मिले, ये हसीन वादिया ये खुला आसमां यासारख्या असंख्य हिंदी आणि दाक्षिणात्य गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या आवाजाच्या मागे एक दुःख दडलेलं आहे. विविध भाषांमध्ये जवळपास 25 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या सुप्रसिद्ध गायिका के एस चित्रा यांनी दहा वर्षांपूर्वी आपली चिमुकली गमावली होती. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *