Breaking News

1/breakingnews/recent

अर्जुन कपूरच्या हातात मंगळसूत्र; मंगळसूत्र मलायकासाठी तर नाही ना?

No commentsमुंबई -

सोसिअल मीडियावर सतत चर्चेत असणारा अभिनेता अर्जुन कपूरने आज इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि चर्चेला उधाण आले. होय, अर्जुनच्या हातात मंगळसूत्र पाहून ही लग्नाची तयारी की नव्या सिनेमाची? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अर्जुनने त्याच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर एक फोटो शेअर केला. यात तो हातात मंगळसूत्र पकडून आहे. या पोस्टमध्ये अर्जुनने बेबो अर्थात करिना कपूरला  प्रश्न विचारला. पण काही लोकांनी यातही मलायका अरोराला  शोधले.

की अ‍ॅण्ड का चित्रपटाच्या वेळची एक आठवण सेटला आणि माझ्या ऑनस्क्रिन 'की'ला मिस करत आहे. हा चित्रपट माझ्या जवळचा आहे कारण तो मी माझ्या आईसाठी केला होता. करीना आणि बल्की सरांसोबत काम केल्यामुळे तर तो अधिकच जवळचा आहे. मला वाटतेय आपण याचा सिक्वेल करावा. काय म्हणतेस करीना? ,' असे हा फोटो शेअर करताना अर्जुनने लिहिले. अर्जुनने खरे तर 'की अ‍ॅण्ड का' या सिनेमाला 5 वर्षे पूर्ण  झाल्यानिमित्त ही पोस्ट टाकली. पण युजर्सनी या पोस्टचा संबंध मलायकाशी जोडला. हे मंगळसूत्र मलायकासाठी तर नाही ना? असा सवाल एका युजरने त्याला केला. अन्य एका युजरने 'की अ‍ॅण्ड का'च्या सीक्वलमध्ये करिना नको, मलायका हवी, असे लिहिले. हे मंगळसूत्र मलायकाच्या गळ्यात बांध आणि संपव, अशी कमेंट एका युजरने केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *