Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - ससून घाटीच्या धरतीवर जिल्हा रुग्णालयात सुविधा मिळणार

No comments

  News24सह्याद्री ससून घाटीच्या धरतीवर जिल्हा रुग्णालयात सुविधा मिळणार..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


१. सावेडी कचरा डेपोत रुग्णांवर अंत्यविधी आजपासून सुरू

कोरूना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नगर जिल्ह्यात  इतर जिल्ह्यातून अतिदक्ष कोरणारुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. उपचार घेत असताना काही कोरोनामुळे  त्यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. 

2. ससून घाटीच्या धरतीवर जिल्हा रुग्णालयात सुविधा मिळणार
पुणे येथील ससून हॉस्पिटल आणि औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर  नगर मधील  सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी  जिल्हा प्रशासनाला दिले. नगर मध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला तातडीने मान्यता देऊ असेही त्यांनी सांगितले.

३. औषधांचा काळाबाजार थांबावा आरोग्य सुविधा सुरळीत करा
रेमदेसिविर औषधांचा काळाबाजार थांबवून पुरेसा साठा उपलब्ध करावा सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाकडून बेड ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे तसेच अहमदनगर जिल्ह्यात पुढील आठ पूर्णता संचार बंदी करण्यात यावी या मागणीचे निवेदन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष आकाश वायकर यांनी दिले आहे.

4. अमरधाम च्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षारक्षक नियुक्त
दिवसेंदिवस नगर शहरात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील नालेगाव अमरधाम वरील ताण वाढला आहे.  महानगरपालिकेच्या नालेगाव अमरधाम मध्ये कोरोना  मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचा मोठा वावर वाढू लागला आहे. कधी कधी तर अंत्यविधी वरून याठिकाणी काहीसे वाद जन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

५. मनपाच्या फ्रन्टलाइन वर्कर साठी इंजेक्शन राखीव ठेवावा
महापालिकेचे काही कर्मचारी सध्या शहरातील हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीत असल्याने हे कर्मचारी  हॉस्पिटल आणि डॉक्टरांचा मागणीप्रमाणे  इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न  करत आहेत. त्यांनी आपल्या सह जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष तसेच मनपा आरोग्य अधिकारी यांना सतत संपर्क केला असून  मनपाचे कर्मचारी जीवावर उदार होऊन जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *