Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

No comments

    News24सह्याद्री - त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES


1. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 40 टन ऑक्सिजनाचा पुरवठा केला जाणार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी  त्रास होत असल्यास आरोग्य विभागाशी  संपर्क साधावा कोरोनावर वेळेत उपचार घ्यावा असे आवाहन  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

2. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके यांच्या पत्नीचे निधन
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके यांच्या पत्नी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांना उपचार साठी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात येत होते मात्र उपचार उपचार आधीच त्याचे निधन झाले
  
3. महसूलमंत्री थोरातांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या व गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोहारे येथील ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसोकडून तातडीची मान्यता मिळवून दिल्याने दररोज नव्याने सातशे ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होणार आहे.
  
4. गोदावरीचा पुल वाचवा आदिनाथ ढाकणे यांची गांधीगिरी
कोपरगाव शहरातील गोदावरी नदीचा पुल वाचवा या मागणीकरीता गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी गोदावरी नदी वरील मौनगिरी महाराज सेतुवर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले

5. घरपोच दारू पोहोचवण्याचा निर्णय मागे घ्या
ऑक्सिजन पोहोचला नाही तरी चालेल, रेमडेसीवीर पोहोचले नाही तरी चालेल पण दारू घरपोच पोहोचली पाहीजे. दारू व इतर व्यसनाने प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने करोना काळात अंमली पदार्थावर अंकुश लावा पण इथे सरकार घरपोच दारू पाठवते आहे. 

6. मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा, स्वतंत्र वीज कर्मचाऱ्याची नेमणूक करा, तसेच ऑक्सिजन भरण्यासाठी लागणारे रिकामे गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्या अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

7. नगर जिल्ह्यातील दहावीच्या 73 हजार विद्यार्थ्यांना दिलासा  
राज्यात करोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

8. बाजार समितीच्या बाहेर  गर्दीच गर्दी
काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडते यांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देवून भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन केले.मात्र पणनची परवानगी नसल्यामुळे बंद ठेवता येणार नाही असे सभापती शिंदे यांनी सांगितल्यावर काल पहाटे शेतकर्‍यांमध्ये गोंधळ उडाला होता. 

9. त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील रोहित कचरू लांडगे या 24 वर्षांच्या तरुणाने  गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी राहुरी पोलिसांनी सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला मृतांची आई शिवबाई कचरू लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

10. आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे अपयश - आ.राजळे
राज्यातील जनतेला आरोग्यसेवा न मिळणे हे सरकारचे मोठे अपयश आहे औषधांचा काळाबाजार होतोय ऑक्सिजनचा तुटवडा आहे माणसं मरत आहेत सरकारला राजकारणा पलीकडे काहीच दिसत नाही विरोधी पक्षाने सरकारवर टीका करण्याऐवजी सरकारच विरोधी पक्षावर टीका करण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिलीच वेळ असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

11. रस्त्यासाठी मिळणार 23 कोटीचा निधी
श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा समजला जाणारा श्रीगोंदा ते मांडवगण रस्ता व श्रीगोंदा-पारगाव सुद्रीक रस्ता व पेडगाव येथील पुलासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव पाचपुते यांनी दिली.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *