Breaking News

1/breakingnews/recent

धोनीचा जडेजाला 'मारने दे, सोच के मार मत खाना' सल्ला अन मॅक्सवेलची दांडी गुल

No commentsमुंबई -

चेन्नई सुपर किंग्सने दमदार फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघावर दणदणीत विजय मिळवत विराट सेनेचा विजयी अश्वमेध रोखला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्यात चेन्नईसाठी हिरो ठरला. जडेजाने दमदार कामगिरी करत 28 बॉलमध्येच 221.43 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 62 धावा केल्या आहे. तर गोलंदाजी मधेही तब्बल 3 बळी घेतले आहे.

दरम्यान जडेजा गोलंदाजी करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला मोलाचा सल्ला दिला जो कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झाला आहे. जडेजा 9 व्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आल्यावर हा प्रकार घडला. जडेजाच्या समोर ग्लेन मॅक्सवेल बॅटींग करत होता. त्यावेळी धोनीने जडेजाला 'मारने दे, सोच के मार मत खाना' असा सल्ला दिला. धोनीनं हा सल्ला देताच पुढच्याच बॉलवर जडेजानं मॅक्सवेलला बोल्ड केले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *