Breaking News

1/breakingnews/recent

१8 एप्रिल सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - अवैध दारूविक्रीप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  
TOP HEADLINES


1. खाजगी  ट्रॅव्हल्स बस  वर कारवाई
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने ब्रेक द चैन मिशन अंतर्गत आतावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद करण्यात आले आहे विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये तसेच संचार बंदी लागू करण्यात आली आहे. 

2. गाढवं चोर गजाआड  
सध्याच्या काळात कोण काय चोरून नेईल. याचा नेम राहिला नाही. राहुरी तालुक्यातून ५६ हजार रूपये किंमतीची आठ गाढवं चोरी गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीसात तक्रार दाखल करण्यात  आली होती या घटनेत एक आरोपी पंढरपूर येथून तर दुसरा आरोपी श्रीरामपूर येथून ताब्यात घेऊन दोघांना गजाआड  करण्यात आले आहे  पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सदर गाढवं चोरी केल्याचे उघड झाले. 

3. संचारबंदीत लहान मुलं घेताय विविध खेळ खेळण्याचा आनंद  
गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यातच आता नववी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास केलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलं मात्र बिनधास्त  खेळताना दिसतात. संचार बंदी मुळे शहरी भागातील मुले घरातच बसून कंटाळलेले आहेत.

4. कोरोनाचे राजकारण करू नये
कोरोना हे जागतिक संकट आहे. आपला जीव वाचवण्यासाठी लाॅकडाउन हाच एकमेव उपाय आहे. १ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन करा. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी पुढे दिवस आहेत, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना श्रीगोंदे येथे लगावला.

5. काेरोना रुग्णवाढ रोखण्यासाठी उपाययोजना करा
 सध्या वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने लढत आहे. मात्र पुरेशा साधनसामुग्री अभावी रुग्णांना सेवा देण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

6. अवैध दारूविक्रीप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
 कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर शनिवारी संचारबंदी व कडकडीत राजूर बंद पाळण्यात येत असूनही राजूर येथून अवैध दारू विक्री  सुरूच होती. अवैध दारूविक्री करणाऱ्या दोन आरोपींना राजूर पोलिसांकडून मुद्देमालासह रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींवर कारवाई करून गजाआड करण्यात यश मिळवले.
    
7. विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी
शनिवार-रविवार विकेंड लॉकडाऊन असताना कर्जत शहरात विनाकारण फिरताना आढळणाऱ्या व्यक्तींना कोणताही दंड न करता थेट रस्त्यावरच त्यांची कोविड अँटीजेन चाचणी करण्याचा उपक्रम कर्जत पोलिस प्रशासन आणि कर्जत नगरपंचायतीने राबवला. 

8. रुग्णांना आता नैसर्गिक ऑक्सिजन
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे जिल्ह्यासाठी दररोज चार टँकर ऑक्सिजनची गरज असताना सध्या फक्त दोन ते तीन टँकर येत आहेत ऑक्सिजन पूर्ण क्षमतेने मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हवेतील ऑक्सिजन रुग्णांना देण्यासाठी यंत्रणा जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आली आहे.

9. जिल्ह्यातील सव्वातीन लाख व्यक्तींनी घेतली लस
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात कोरोना  प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी वळू लागले आहेत जिल्ह्यातील 2 लाख 93 हजार 502 जणांनी पहिला तर 32 हजार 291 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे जिल्ह्यात एकूण तीन लाख 25000 793 जणांना लस देण्यात आली आहे
   
10. ६५ हजारांची चोरी
राहता तालुक्यातील रामपूरवाडी रोडवरील एकृखे येथे चोरट्यांनी घराच्या किचनचा दरवाजा तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडलीये याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात काशिनाथ दगडू घनघाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *