Breaking News

1/breakingnews/recent

26 एप्रिल सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधीच मोफत लसीकरणाचं श्रेय घेणं चुकीचं...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES

1. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचावर टीका .
सध्या देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे.अनेक राज्य केंद्राकडे मदत मागत आहेत. “केंद्र सरकारकडून रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळाला आहे. इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलाय. 

२. लसींचा पुरवठा करताना हात आखडता घेणे योग्य नाही
सध्या राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे त्यामुळे लसींचा तुटवडा जाणवत आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करताना हात आखडता घेणे योग्य नाही. ४५ वर्षे वयाच्या वरील सर्वांचे लसीकरण करायचे असेल तर राज्याला दररोज आठ लाख लसींची आवश्यकता आहे.

३.आग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी ५ सदस्यांची चौकशी समिती स्थापन
विरारच्या विजयवल्लभ या खासगी रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची चौकशी समिती स्थापन केलीये . या समितीला १५ दिवसांत चौकशी करून अहवाल राज्य शासनाला द्यायचा आहे. 

४. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं  ट्विट डिलीट
देशात १ मेपासून १८ वर्षांच्या पुढील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली असून ठाकरे सरकारकडून अजूनही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केलीये तर दुसरीकडे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केल होत मात्र नंतर हे ट्विट डिलीट झाल्याने यावर आश्चर्य व्यक्त करण्यात आल आहे.

५. 70 हजार रुपयांना 1 रेमडेसीवीर विकणाऱ्या 3 मेडीकल दुकानदारांस अटक
देशभरात रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येतोय . काही दिवसांपूर्वीच मुंबई, नागपूर यांसह अनेक ठिकाणी रेमेडीसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यां लोकांना अटक करण्यात आली होती. 

६. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधीच मोफत लसीकरणाचं श्रेय घेणं चुकीचं
राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मोफत लसीकरणाचं श्रेय घेण्यात येत आहे. त्यावरून काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही पक्षांना फटकारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्याआधीच त्याचं श्रेय घेणं योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे म्हटलं आहे. 

७. कोरोनाचा कहर, शेअर बाजारातील टॉप टेन पैकी 9 कंपन्यांची मार्केट कॅप घसरली
भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना विषाणू संसर्गानंतर भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना काळात सॅनिटायझर, साबण आणि सफाईचं साहित्य मोठ्या प्रमाणावर विकलं जात आहे. 

८. मुंबईतील 'कोव्हिड वॉरिअर्सं'साठी खाण्याची व्यवस्था
देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सलमान खान याने कोरोनाशी दोन हात करत असताना गरजूंना अन्नधान्याचे किट आणि पैसे दान केले होते. आता पुन्हा एकदा सलमान मदतीसाठी पुढे आला आहे. रिपोर्टनुसार सलमान खान फ्रंटलाईन कामगारांसाठी फूड किट्स पाठवत आहे. तो सर्वांना या फूड किटचे वाटप करत आहे. 

९. SBI Alert! असे कॉल येत असतील तर सावधान
देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरत असताना भीतीचं वातावरण आहे. या काळात लोक घरीच आहेत त्यामुळे कॅशलेस ट्रांजेक्शन वाढलेले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. त्याच संदर्भात SBIने ट्विट करत आपल्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. 

१०. प्रसिद्ध चित्रपट संकलक वामन भोसले यांचे निधन
प्रसिद्ध चित्रपट संपादक वामन भोसले यांचे निधन झाले. सोमवार, 26 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1969 मध्ये त्यांनी राज खोसला यांच्या 'दो रास्ता' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. 'मेरा गाव मेरा देश', 'इंतेकाम', 'इंकार', 'मौसम', 'आंधी', 'दोस्ती', 'कर्ज', 'हिरो', 'सौदागर' आणि 'गुलाम' इत्यादी हिंदी चित्रपट आणि अशाने अनेक सुपरहिट सीरियल त्यांनी संपादित केल्या आहेत. 2002 मध्ये त्यांनी कामातून निवृत्ती घेतली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *