Breaking News

1/breakingnews/recent

23 एप्रिल सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री पंढरपुरात लॉकडाऊनचे कडकडीत पालन...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. “राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो”

 विरारमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान विरारमधील घटनेवरुन भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

2. महाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा एकदा ई- पासची तरतूद   

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात 'ब्रेक दि चेन'अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. 

3. ऑक्सिजनच्या अभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू
देशातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अत्यंत भयानक होत आहे. ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचं दिसून येतंय. त्यातच आता दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

4. रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार नाराज
राज्यात कोरोना रुग्णांची संख्य प्रचंड प्रमाणात वाढत आहे. रोज 65 हजाराच्या पुढे नवे रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणवेवर ताण पडतो आहे. रोज 10 ते 15 टक्के रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज भासते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सराकारने राज्याला रेमडेसिव्हीरच्या केलेल्या पुरवठ्यावरुन चांगलंच राजकारण रंगलं आहे. 

5. विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग
राज्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहे. विरारमधील एका रुग्णालयातील  अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे.

6. लातुरात दारूची खुलेआम विक्री
 कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन असताना लातुर येथे दारूची खुलेआम विक्री होत आहे   शहरातील बस स्थानाकाजवळील तापडिया व्यापारी संकुलात चव्हाण वाइन शॉपमधून दारूसाठी  सकाळी तळीरामानी गर्दी केली वाईन शॉपमधून काही बॅगमध्ये तर काहीनी बॉक्समध्ये दारूचे खोके खरेदी केली आहेत काही वेळा नंतर पोलीस आले व निघून गेले पण पुन्हा दारूची विक्री जोरातच सुरू झाली 

7. घनकचरा प्रकल्पला आग
जालन्यातील अंबड येथे असलेल्या घनकचरा प्रकल्पला आग लागल्याची घटना घडली आहे काल सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागली होती तेव्हा हि  आग विझवण्यात आली होती मात्र हि आग विझली नसल्याने पुन्हा रात्री आठ वाजेच्या सुमारास हि आग भडकली कचरा जळत असल्याने हि आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली  मात्र जालना नगर परिषदेच्या  अग्निशमन दलाच्या कर्मचार्यंनी शर्तीतचे प्रयत्न करत हि आग आटोक्यात आणली असून सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. 

8. पंढरपुरात लॉकडाऊनचे कडकडीत पालन
आज चैत्र शुद्ध एकादशी म्हणजेच, कामदा एकादशी, कोरोना सावटात हा सोहळा पार पडत आहे. नवीन मराठी वर्षातील वारकरी संप्रदायाचा हा पहिला सोहळा असला तरी कोरोनाच्या संकटामुळे या कामदा एकादशीला एकाही भाविकाला पंढरपूरमध्ये प्रवेश नसणार आहे कोरोना संकटामुळे काल रात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

 9. मुंबई पोलिसातील अजून एका अधिकाऱ्याला NIA नं केली अटक!

अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसातील अजून एका पोलीस अधिकाऱ्याला NIA नं अटक केली आहे. एआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून याआधी सचिन वाझे, रियाझ काझी यांच्यावर कारवाई झालेली असताना या प्रकरणात आता अजून एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव आलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना एनआयएनं अटक केल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.

10. लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्यास ५०० रुपयांचा दंड

औरंगाबाद: करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळेच लसीकरणाला प्राधान्य देत ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी महालसीकरण मोहीम हाती घेतली असून ११५ वॉर्डात लसीकरण सेंटर सुरू करण्यात आली आहेत. ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन करीत टाळेबंदीनंतर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल अन्यथा ५०० रुपये दंड आकारला जाईल

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *