Breaking News

1/breakingnews/recent

21 एप्रिल सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - कोरोनाच्या संकटकाळातही भारतात 160 टन सोन्याची आयात.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
देशातील कोरोनाच्या चिंताजनक परिस्थिती दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार, हे सरकारला माहीत होते, त्यानंतरही गेल्या ८ ते ९ महिन्यांत कोणतीही तयारी झाली नसल्याचे प्रियंका गांधींनी म्हटले आहे. यासह त्यांनी देशवासीयांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना लस बाहेर निर्यात न केल्याबद्दल सरकारला प्रश्न देखील विचारला आहे.

२. कंगना रनौतचा हल्लाबोल!
आता पुन्हा एकदा कंगना राणावत  तिच्या एका ट्विटने चर्चेत आली आहे. भारतातील वाढती लोकसंख्या या विषयावर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे देशात लोक मरत आहेत, असे कंगना म्हणाली. या अभिनेत्रीने ट्विटकरत सांगितलं आहे कि , 'देशात लोकसंख्या सतत वाढत असल्याने लोक मरत आहेत. 

३. शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार  यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली. गेल्या जवळपास 21 दिवसात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.

४. केदारनाथसह अनेक ठिकाणची बुकिंग रद्द
उत्तराखंड राज्यात केदारनाथ सह चोपता भागातील अनेक पर्यटनस्थळांची बुकिंग पर्यटकांनी रद्द केली असून गेल्या आठवड्यात १० लाखाहून अधिक बुकिंग रद्द केली गेली आहेत. परिणामी येथील होम स्टे, हटस, कॉटेज, रेस्टॉरंट चालक, तेथे काम करणारा कर्मचारी वर्ग यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.इथले पर्यटन व्यावसयिक यामुळे अडचणीत आले आहेत.

५. आंध्र सरकार कर्मचाऱ्यांना देणार वेगळी सुविधा
दिल्ली पाठोपाठ आता आंध्रप्रदेश सरकारने इलेक्ट्रिक वाहन वापरा संदर्भात मोठे पाउल उचलले आहे. केंद्र सरकार एजन्सीच्या मदतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक दुचाकी हप्त्यावर घेता याव्यात यासठी योजना आखली जात असल्याचे समजते. 

६. कोरोनाच्या संकटकाळातही भारतात 160 टन सोन्याची आयात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे मात्र मात्र, सोनं  या सगळ्याला अपवाद ठरताना दिसत आहे. कारण, कोरोना संकटाच्या काळातही भारतात सोन्याची विक्रमी आयात होताना दिसत आहे.जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क घटवल्यामुळे पिवळ्या धातूची मागणी आणखीनच वाढली आहे. 

७. 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार
मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 25 वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी तिच्यावर गँगरेप केला. 

८. अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णाची 'कलाकारी
कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या अतिदक्षता विभागात बासरीचे मंजूळ स्वर कानावर पडले तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

९. लातूरमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे आणीबाणी
ऑक्सिजनअभावी डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर उतरल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं.लातूर शहरातील बार्शी रोडवरील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी आज सकाळी रस्त्यावर ठिय्या मांडला. 

१० महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोना
टीम इंडियाचा माजी कप्तान आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या  आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि मातोश्री देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांना झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *