2 मार्च Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - मास्क विरोधातील कारवाई दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. पूजा चव्हाणचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती
मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. दर दिवशी या प्रकरणी एक नवा खुलासा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर अली आहे.
2. मुंबई फिल्मसिटीच्या कॅन्टीनचा प्रश्न शासन दरबारी
गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि तिथे कॅन्टीन चालवणारे लक्ष्मण गायकवाड यांचा वाद आता सरकार दरबारी गेला आहे. कोर्टाने चित्रनगरीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर प्रशासनाने गायकवाड यांना 48 तासांची मुदत देऊन कॅन्टीन मोकळे करायला सांगितलं होतं. पण गायकवाड यांनी स्वतःला कॅन्टीनमध्ये कोंडून घेत आपल्यावर अन्याय झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
3. शरद पवारांनी घेतली लस
भारतात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. आता कोरोनावर मात करणारी लस खासगी रूग्णालयात देखील उपलब्ध असणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
4. वाढत्या कोरोनामुळे पुण्यातही निर्बंध कडक
राज्यात कोरोनाचं थैमान पुन्हा एकदा सुरू झालं आहे. ग्रामीण भागातून कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती शहर, अचलपूर इथे 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर यवतमाळमध्ये 48 तास संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासोबत आता पुण्यातही काही नियम कडक केले आहेत.
5. मास्क विरोधातील कारवाई दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने देखील नागरिकांना मास्क वापरण्यासह सोशल डिस्टनसींगचे पालन करावे असे आवाहन केलं आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिकांकडून निष्काळजीपणा सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईस काही मुजोर बेजबाबदार नागरिक विरोध करतात त्यातूनच अनेकदा वाद घडताना दिसतात.
6. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव - उदयनराजे
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे, अशी जाहीर टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान, केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही सह्याद्रीमधील ऑनलाईन बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले आहे.
7. मुंबईची वीज घालवण्यामागे चीनचाच हात, गृहमंत्र्यांचा शिक्कामोर्तब
मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रो जी अचानक वीज गेली होती. यामागे चीनचा हात होता, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली आहे. या 'बत्तीगुल' प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे देण्यात आला होता.
8. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ चुल मांडून पेट्रोल पंप समोर आंदोलन.
परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने शहरातील आर. आर. पेट्रोल पंप समोर चुल मांडून पेट्रोल, डिझेल, गॅस दर वाढ विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.
9. डोंबिवलीत शलाका सोसायटी ने सुरू केली शून्य कचरा मोहीम
कल्याण-डोंबिवली महानगरपालिके कडून शहरामध्ये शून्य कचरा मोहीम राबविण्यात येत आहे.यामध्ये ओला कचरा व सुखा कचरा विलगिकरन करण्यास महापालिकेकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर डोंबिवली मानपाडा रोड वरील शलाका सोसायटी मध्ये राहणाऱ्या वर्षा शिखरे व त्याचे पती यांनी ओला कचरा बाहेर न टाकता तो साठवून ठेवण्यास सुरवात केली.
10. डोंबिवली लोढा हेवन रेशन दुकानांमध्ये महिलेची हत्या
डोंबिवली लोढा हेवनयेथील रेशन दुकानांमध्ये किर्कोळ वादातून महिलेची हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीराम इक्बाल सिंग या कामगाराला संशयावरून अटक केली असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
No comments
Post a Comment