Breaking News

1/breakingnews/recent

12 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री -  लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याने जाहीर निषेध - प्रकाश आंबेडकर....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट



TOP HEADLINES

1. ग्रामिण पत्रकार संघ महाराष्ट्र  जिल्हा संपर्क प्रमुख पदी कुंदन बेलदार
पाचोरा येथे ग्रामिण पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणीत सत्यकाम न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक कुंदन बेलदार यांची जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदावर  नियुक्ती करण्यात आले.

2. माजी मंञी तथा कुटूंबीय कोरोना पॉझिटिव्ह.
परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा पाथरी विधानसभेचे आमदार सुरेशराव वरपुडकर व त्यांचे कुटूंबिय हे केलेल्या चाचणीतून कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

3. लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याने जाहीर निषेध-प्रकाश आंबेडकर
 राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत.याबाबत त्यांनी कोरोना वाढत असल्याचे कारण दिले आहे.
4.  एम पी एस सी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनाच राज्य शासनाला निवेदन 
अकोल्यातील रामनगर येथे जमा झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या निर्णया विरोधात नारेबाजी केली आहेय. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी रामनगरला येऊन विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले आहेय..

5. युवा मोर्च्याच्या वतीने चिखलीत निदर्शने
ऐन तोंडावर आलेली राज्यसेवेची MPSC ची पूर्व परीक्षा रद्द करून सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा घणाघाती आरोप आमदार सौ श्वेताताई महाले यांनी परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर केला आहे . 
    
6.  गोरेगांव मध्ये कोहामारा  काली मांतेची ची मूर्ति  स्थापना
मुरादोली बेलापहाड़ी चुलबंद येथे काल काली मातेची  मूर्तीची स्थापना केली गेली .तेथे  वास्तविकमध्ये विविध देवी देवता ची मूर्ति स्थापित आहे. 

7. महाशिवरात्री दिनानिमित्तही मंदिरे बंद 
गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील श्री रामेश्वर मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे होणारा शिवरात्री महोत्सव तसेच दुसऱ्या दिवशी निघणारी पालखी मिरवणूक रद्द करण्यात येऊन भावीकाच्या दर्शनासाठी  महाशिवरात्रीच्या दिवशी  मंदिर बंद ठेवण्यात आल्याने काही भावीकांनी महामार्गावरुन हात जोडून दर्शन घेतले.

8. राजर्षी छत्रपती शाहु महाराजांचे नावे प्रवेशद्वार उभारण्याची आयुक्तांंकडे मागणी
उल्हासनगर नंबर तीन परीसरातील छत्रपती शाहु महाराज यांच्या नावे असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे भव्य असे प्रवेशद्वार उभारण्याची मागणी .

9. खिडकाळेश्वर प्रसिद्द मंदिर-  दर्शन घेण्यासाठी प्रवेश बंदी
डोंबिवली पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर म्हूणन खिडकाळेश्वर मंदिर प्रसिद्द आहे. डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील खिडकाळी  गावात हे मंदिर असून महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक  कल्याण, डोंबिवली , नवी मुबंई , ठाणे दर्शनासाठी येत असतात मात्र यावर्षी कोरोनामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी प्रवेश बंदी केली आहे. 
10. आयुक्तांच्या आदेशाला डोंबिवलीत अनेक ठिकाणी केराची टोपली
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याने पालिका आयुक्त आणि पोलिसांनी निर्बंध आणत दुकानांना आणि हातगाड्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र डोंबिवलीत अनेक ठिकाणी दुकाने आणि हातगाड्या चालूच होत्या.  



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *