Breaking News

1/breakingnews/recent

11 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

       News24सह्याद्री - बोगी खाली अन,आरक्षण फूल्ल; कोरोनाच्या नावावर रेल्वेची सुपरलूट!....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. बोगी खाली अन,आरक्षण फूल्ल कोरोनाच्या नावावर रेल्वेची सुपरलूट 
कोरोना संसर्ग व वाढते कोरोना बाधित लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून जनरल तिकीट देणे बंद करण्यात आली असून कुठेही प्रवास करायचा असल्यास आरक्षीत तिकीट प्रवाश्यांना घ्यावी लागते. तर त्यासाठी आता ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींगची व्यवस्थाही देण्यात आली आहे.

2. अकोल्यात अपार्टमेंटमधे आढळला महिलेचा मृतदेह
अकोल्यातील खदान पोलिस स्टेशन हद्दीतील तुकाराम चौक कडून जुने आरटीओ ऑफ़िसकड़े जाणा-या रिंग रोडवरील एका अपार्टमेंट मधे एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच ख़ळब़ळ उडाली आहेय.

3. मास्क न घातल्याने वाहनधारकांची लुटमार
शिरूर कासार नगर पंचायत ने मास्क न घालून फिरणाऱ्यांवर कार्यवाही करताना दिसत आहे आतापर्यंत शिरुरकासार नगरपंचायतीमार्फत विनामास्क फिरणार्‍या एकुण ७० लोकांवर कारवाई करुन अठरा हजार एकशे नव्वद रुपयांचा चा दंड वसुल करण्यात आला आहे. 
4. गंगापूर नगरपरिषदेच्या  वतीने तात्पुरत्या स्वरूपाचे जम्बो हॉस्पिटल उभारणार 
 गंगापूर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही बाब चिंतेची आहे यासाठी गंगापूर नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता समितीच्या वतीने  बैठकीचे आयोजन करण्यात आले.

5. अकोल्यात अटी व शर्तीचे पालन करून महाशिवरात्री साजरी 
आज महाशिवरात्र आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गेल्या आठवड्यात काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे मंदिर बंद राहण्याची शक्यता होती. पण, बुधवारी झालेल्या एका बैठकीत पोलिसांनी काही अटी व शर्तींच्या आधारे शहराचे ग्रामदैवत असलेले श्री राजराजेश्वर मंदिर सुरु ठेवण्यास व भाविकांना दर्शन घेण्यास मोकळीक दिली आहे. 

6. उल्हासनगरात डंम्पिंग ग्राउंडला भिषण आग..

उल्हासनगर कँम्प.नंबर पाच गायकवाड पाडा येथील डंम्पिंग ग्राउंडला काल दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने विभागातील नागरीकांंची एकच धावपळ उडाली होती.दुपारी लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यास उल्हासनगर महानगरपालिकेचे अग्निशमक दल रात्री उशीरापर्यंत पुर्णपणे अपयशी ठरले.

7. कल्याण-डोंबिवलीत पुन्हा कडक निर्बंध !
डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शहरात पुन्हा कडक र्निबध लादले आहेत.

8. कचरा व पाणी प्रश्नांनसाठी गृहसंकुलकांनी घेतली खासदारांची भेट !
डोंबिवलीतील काही ग्रामीण भागामध्ये पाण्यामुळे नागरिकांना वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

9. पनवेल परिसरात पुन्हा वाढते कोरोना रुग्ण 
 पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण सापडून एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी 10 मार्च 2020 ला पनवेलमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. कोरोना रुग्णाच्या वर्षपूर्तीनंतर कोरोना पनवेलमधून नष्ट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र तसे न होता, आज पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.सद्यस्थितीमध्ये लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. 

10. पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी केंद्राकडे एकत्रित मागणी करू-अजित पवार 
राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याची ओरड विरोधक करत आहेत. राज्यात इंधनाचे दर कमी असावेत यासाठी आम्हीही आग्रही आहोत. त्यासाठी केंद्र सरकारने लावलेले विविध कर कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्हाला विरोधकांची साथ हवी आहे. आम्ही आणि तुम्ही दोघांनीही पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी केंद्राकडे एकत्रित मागणी करू, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *