Breaking News

1/breakingnews/recent

10 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

      News24सह्याद्री - अकोल्यात 24 तासात 173 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


१. डोंबिवलीत मोफत चिकित्सा शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !
 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत माजी नगरसेवक रणजित जोशी व माजी नगरसेविका वृषाली जोशी यांच्यावतीने खास महिलांसाठी मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहकार्याने मंगळवारी हे शिबिर पार पडले. 

2. महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांचा निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन संघातर्फे सन्मान सोहळा संपन्न !
जग भरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत सुद्धा हाहाकार माजवला होता वर्ष भरात ६० हजाराचा आकडा पार केलेल्या रुग्णाना बरे करून घरी सुखरूप पाठविण्याच काम आयुक्त डॉ .विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं त्यांच्या सोबत ज्या आधिकारी वर्गाने मेहनत घेतली त्यात रणरागिणी महिला आधिकार्यांचा सिंहाचा वाटा होता.

३. जागतिक महिला दिनानिमित्त महीला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान..
ANC..मंथन चँरीटेबल ट्रस्ट हया सामाजिक संघटनेच्या वतीने काल जागतिक महीला दिनानिमित्त उल्हासनगरातील महीला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुळसीचे रोप व पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला.

४. अकोल्यात 24 तासात 173 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह
अकोला कोरोना अपडेट 24 तासात 173 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत 2151 अहवालात पैकी 1978 जणांचे अहवालात निगेटीव्ह आले आहेत एकूण कोरोना बाधितांचा आकडा 19500 झाला आहे दिवसभरात 3 जणाचा मृत्यू झाला आहे.

५. मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलर आणि ट्रकचा जोरदार अपघातात, दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी
मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलर आणि ट्रकचा जोरदार अपघातात, दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी
केमीकल ड्रम भरलेल्या ट्रकमुळे दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी पुण्याकडे जाताना बोरघाटाच्या सुरुवतीला झाला अपघात पुण्याकडे जाणारी वाहतुक थाबंवली आहे.

6. ओडिशातील जंगलांमध्ये 10 दिवसांपासून धुमसती आग
संपूर्ण देशात उन्हाळ्याची चाहुल लागलीय. तापमानाचा पारा चढण्या सुरुवात झालीय. याच काळात जंगलांना आग लागण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली असते. 

7. सुलभतेसाठी अधिक लसीकरण केंद्रे
पालघर : जिल्ह्यतील ३४ केंद्रांमधून करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून ३५ हजार नागरिकांना लसीची पहिली मात्रा तर आठ हजारांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. 

8. नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन
ब्रिटिश संसदेत भारतातील कृषी सुधारणांबाबत चर्चा करण्यास आली, त्याबद्दल भारताने मंगळवारी ब्रिटिश उच्चायुक्तांना पाचारण करून त्यांच्याकडे याबद्दल तीव्र आक्षेप नोंदविला.

9. उद्घाटनापूर्वीच माकुणसार पुलावरून वाहतूक
पालघर :  पालघर व सफाळा या दोन शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील माकुणसार पुलाचे काम सोमवारी पूर्ण झाले. उद्घाटनानंतर या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे प्रयोजन असताना तत्पूर्वीच पर्यायी मार्गाने त्रस्त असलेल्या वाहनचालकांनी त्याचा वापर सुरू केला आहे.

10. संसदेत इंधनभडका!
इंधन दरवाढीच्या मुद्दय़ावरून संसदेत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही सदनांचे कामकाज तहकूब करण्यात आले. इं

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *