1 मार्च Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. सेल्फी काढताना नाव उलटली, बाप लेकाचा मृत्यू
करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नासाठी आलेल्या अकलूज येथील शेंडगे कुटुंबाला उजनी जलाशयात नावेतून फिरण्याचा मोह घातक ठरला, सेल्फी काढण्याच्या नादात नाव उलटून शेंडगे कुटुंबातील बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2. राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख चढताच
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. काल पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली.
3. दख्खनचा राजा जोतिबाचे खेटे स्थगित
दख्खनचा राजा जोतिबाचे खेटे स्थगित करण्याचे आदेश दिल्यानंतर काल जोतिबा डोंगरावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला.
4. मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला केंद्रीय मंत्री अनुपस्थित
कोर्टातील स्थगितीनंतर मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र या बैठकीला केंद्रीय न्याय व विधी मंत्री रवीशंकर प्रसाद अनुपस्थितीत राहिले. या महत्त्वाच्या बैठकीला केंद्रीय मंत्रीच उपस्थित नसल्याने बैठकीतील इतर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतल.
5. मुंबईत पुन्हा 'झिरो कोरोना' मिशन
मिशन झिरो पूर्ण करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याचे , आवाहन मुंबई महापालिकेने यापूर्वी केले होते. मात्र गेल्या पंधरा एक दिवसांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेचे देखील धाबे दणाणले आहेत.
6. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, 1 मार्चपासून सुरू होत आहे. कोरोना, मराठा आरक्षण, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, शिक्षक आंदोलन यांसारख्या मुद्दय़ांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची हवा विरोधकांनी केली आहे.
7. थाळनेर पोलिसांची सतर्कता, गुरांची तस्करी केली उघड
शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैद्य रित्या गुरांची होणारी वाहतूक उघड झाली, या कारवाईत १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असुन आरोपी मात्र फरार झाले आहेत.
8. गंगापूर ऊपजिल्हा रुग्णालयात एकच रुग्णवाहिका
गंगापूर ऊपजिल्हा रुग्णालयात एकच रुग्णवाहिकेवर रुग्णालयाचा भार असल्याने त्याच रुग्णवाहिकेद्धारे प्रसुतीचे, कोरोनाचे तसेच आपघाताचे रुग्ण घेऊन जावे लागत आहे.
9. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र अंनिसचे आवाहन
उदयोन्मुख पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर उतरुन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड यांनी केले.
10. भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
दिव्यातील अनधिकृत बांधकामाचा विषय हा चांगलाच गाजतो आहे.त्यातच ठाणे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर सुद्धा अनधिकृत बांधकामाला सुरवात झाली आहे. हे लक्षात येताच दिव्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी हे बांधकाम होउ नये म्हणून महापालिकेशी पत्र व्यवहार केला.
No comments
Post a Comment