१ मार्च फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजपा आमनेसामने....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. अधिवेशनावर कोरोनाचं सावट
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे.
2. आरोग्यसेवक परीक्षेचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप,
राज्यात काल आरोग्यसेवक, लॅब असिस्टंटसाठी परीक्षा घेण्यात आल्यात. मात्र, नागपूरच्या जी एच रायसोनी महाविद्यालयातील सेंटरवर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे.
3. विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजपा आमनेसामने
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली असून त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
4. शिवसेनेचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
राज्यात एकीकडे करोना संकट पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची भीती असताना दुसरीकडे प्रशासन वारंवार मास्कचा वापर करा असं सांगत आहे.
5. राज्यात मागील २४ तासांत ८ हजार २९३ नवे करोनाबाधित
राज्यातील करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वेगाने वाढताना दिसत आहे. मागील तीन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांची संख्याही ८ हजारापेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे.
6. जागतिक अस्थैर्याचे शेअर बाजारात पडसाद
शुक्रवारी बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मधील बेंचमार्क इक्विटी निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांनी घसरले. जागतिक बाँड बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला आणि इतर मालमत्तांच्या विक्रीत वाढ होण्याची भीती निर्माण झाली.
7. संक्रमित फार्मवरील 29 हजार कोंबड्या नष्ट
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे थैमान असतांना आता बर्ड फ्लूचे देखील संकट ओढावले आहे जिल्ह्यातील भानखेडा परिसरातील धीमान पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला होता.
8. आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर
फ्लिपकार्ट कंपनीत टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने चक्क फ्लिपकार्ट कंपनीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
9. व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी,
अकोला जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आठ मार्च पर्यंत संचार बंदीचे आदेश दिलेले आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद आहेत. कपडा व्यवसायिक, चप्पल व्यवसायिक, इलेक्ट्रिक व्यवसायिक यांच्यासह आदी व्यवसायांचे दुकाने बंद असल्यामुळे त्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येत आहे.
10. रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे अरविंद भाेंडे काळाच्या पडद्याआड .
रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे हास्यकवी अरविंद भाेंडे यांचे २८ फेब्रुवारी राेजी निधन झाले. आपल्या कला कृतींच्या माध्यमातून साहित्य क्षेत्राला समृद्ध करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.
No comments
Post a Comment