Breaking News

1/breakingnews/recent

15 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

       News24सह्याद्री -एसटीच्या गाड्यांची धाव कर्नाटक सीमाभागापर्यंतच...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. नागपूरमध्ये लॉकडाऊन, लातूरमध्ये नाईट कर्फ्यू

सध्या राज्यात कोरोना रुण्गांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी नागपुरात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून लातूरमध्ये 31 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. 

2. सचिन वाझेंनी घेतलं मोठ्या अधिकाऱ्याचं नाव?

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) वेगवान तपासामुळे गेल्या काही तासांत अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. 

3. नाणार जमीन व्यवहाराची चौकशी सुरू

नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरलेली असतानाच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. 

4. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; निलेश राणेंची मागणी

सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्रीच जर अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही

5. महाराष्ट्रात दरदिवशी कोरोनाचा स्फोट

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थित होत चालली आहे. 

6. एसटीच्या गाड्यांची धाव कर्नाटक सीमाभागापर्यंतच

कर्नाटकातील सीमाप्रश्‍नाच्या पार्श्‍वभूमीवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाडी सीमाभागापर्यंतच नेण्याची सूचना कर्मचाऱ्यांना दिली आहे. 

7. आठवड्याभरात २६ हजार रुग्णांची नोंद

विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली हे तीन जिल्हे वगळले इतर सात जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मागील आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

8. मंत्रालयाचे वेळापत्रक बदलले

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी निर्बंध घातले आहेत.

9. मुळा नदीतील जलपर्णीबाबत तातडीने उपाय योजना करा : खासदार गिरीश बापट

मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णी मुळे पुणे, पिंपरी चिंचवड तसेच खडकी कॅन्टोमेंट परिसरातील लोकांना त्रास होत असून त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

10. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं पुन्हा निलंबन

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं निलंबन झालय. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबितं करण्यात आलय मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीये


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *