Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - मंगलकार्यालयासाठी २०० जणांना परवानगी द्या

No comments

    News24सह्याद्री मंगलकार्यालयासाठी २०० जणांना परवानगी द्या..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. नगर मध्ये होळी साजरी
शहरात घरा-घरात होळी साजरी करण्यात आली घरा समोर सोसायटीमध्ये होळी पेटवून कोरोनाचा  नाश होऊ दे असे साकडे घालण्यात आले सामुदायिक होळी पेटवण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते यंदा झाली नाही सामाजिक आंतर राखत व मास लावूनच अनेकांनी होळी पेटवली

2. मंगलकार्यायासाठी २०० जणांना परवानगी द्या
मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांसाठी ५० ऐवजी २०० लोकांच्या कार्यक्रमांसाठी परवानगी मिळावी, अशी मगाणी अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

3. कोरोना रुग्णांवर फुलांची उधळण करून होळी साजरी
घर घर लंगर सेवा व महापालिकेच्या वतीने हॉटेल नटराज येथे सुरू करण्यात आलेल्या गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांवर फुलांची उधळण करून होळी साजरी करण्यात आली. कोरोना रुग्णांचे आत्मबळ वाढवण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. 

4. बूथ’ने रुग्णसेवेचा आदर्श निर्माण केला : कोठारी
कोरोना महामारीसमोर संपूर्ण जग हतबल झाले असताना नगरमधील बुथ हॉस्पिटलमधे धाडस दाखवत कोरोना बाधितांची आपुलकीने सेवा केली. हजारो रूग्णांना येथे दर्जेदार उपचार मिळाले. आता कोरोनाच्या दुसर्या लाटेतही बुथ हॉस्पिटलची टीम तितकाच सेवा भाव ठेवून कार्यरत आहे. 

5. पालकमंत्री हसन मुश्रीफ आज  नगर दौऱ्यावर  
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज गर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली असल्याने पालकमंत्री येत आहेत.दुपारी १:३० वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयातच होईल.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *