हार्दिक जोशीच्या कुटुंबीयांनी केले नव्या पाहुण्यांचे स्वागत

मुंबई
तुझ्यात जीव रंगला या मालिके मधून प्रसिद्ध झालेला या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर पाठक बाई ही भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकारली होती. हार्दिक हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच त्याने एक बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून हे बाळ कोणाचे आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हार्दिकने एका गोंडस बाळासोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘माझ्या बहिणीच्या आयुष्यात या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. त्याबद्दल मी तिचे अभिनंदन करतो. अयांश तुझे स्वागत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हार्दिकच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हार्दिकने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगा पतंग’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण त्याल ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. या मालिकेतील राणादाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. त्यापूर्वी त्यान क्राइम पेट्रोल, अस्मिता, दुर्वा, स्वप्नांच्या पलीकडे या
No comments
Post a Comment