Breaking News

1/breakingnews/recent

खुशाल करा, सामान्य आणि गरीब कुटूंबाला २० हजार रूपये द्या, मनसेची मागणी

No comments


मुंबई 

कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईसह राज्यभरात शासकीय यंत्रणा लॉकडाऊनच्या परिस्थितीसाठी कामाला लागलेल्या असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने Lockdown कालावधीतील आर्थिक मुद्द्यावर नेमक बोट ठेवले आहे. लॉकडाऊनची झळ ही सर्वसामान्य आणि गरीबांनाच बसते आहे. हातावरच पोट असणाऱ्यांचा मुद्दा मनसेने लॉकडाऊनच्या निमित्ताने उपस्थित केला आहे. 

आर्थिक अडचणीमुळे गरीबांवर ओढावणाऱ्या संकटाचा मुद्दाही मनसेने मांडला आहे. त्यासोबतच बेरोजगारीचा विषयही मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे. लॉकडाऊन खुशाल करा पण त्याचवेळी सामान्य आणि गरीब कुटूंबाला २० हजार रूपये द्या अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. भाजप सरकारने देशभरात राबवलेल्या वेगवेगळ्या कॅम्पेनचा समाचारही मनसेकडून घेण्यात आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *