Breaking News

1/breakingnews/recent

आयपीएल गाजवण्यासाठी नवदीप सैनी सज्ज

No commentsमुंबई -

आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या  संघातील जलदगती गोलंदाज नवदीप सैनीने टीम इंडियाचे तिकीट मिळवले. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी न केल्यामुळे, तसेच पुरेशी संधी न मिळाल्याने सैनीचं भारतीय संघातील स्थान पक्क झालेले नाही. 2019 मध्ये त्याने एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 2020 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये त्याने कसोटी संघात पदार्पण केले. 

आतापर्यंत त्याला ज्या काही संधी मिळाल्या, त्यात त्याने अद्याप मोठी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करण्याचा मनसुबा सैनीने आखलेला असणार हे नक्की. नवदीप सैनीने आतापर्यंत 2 कसोटी सामन्यांमध्ये 4 बळी मिळवले आहे. तर 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 6 बळी मिळवले आहेत. आतापर्यंत 10 टी-20 सामन्यांमध्ये त्याला भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहेत. त्यात त्याने 13 बळी मिळवले आहेत. 17 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *