Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - बिग बींचा 'चेहरे' कोरोनामुळं अडचणीत

No comments

 News24सह्याद्री बिग बींचा 'चेहरे' कोरोनामुळं अडचणीत..पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES

1. माधुरी दीक्षितच्या 'डान्स दिवाने 3'मध्ये कोरोनाचा विस्फोट
कोरोनाचा कहर वाढत असताना आता शूटींग स्थळी देखील  व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळतोय. माधुरी दीक्षित जज असलेल्या 'डान्स दिवाने 3' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून  शोमधील तब्बल 18 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. 

2. बिग बींचा 'Chehre' कोरोनामुळं अडचणीत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  यांचा 'चेहरे' हा चित्रपट गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. खरं तर हा बिग बजेट चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं प्रदर्शन लांबणीवर गेलं.त्यानंतर लॉकडाउन उठल्यामुळं येत्या 9 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होईल.

3. Ram Setu फिल्ममधील अक्षय कुमारचा लूक
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार  सध्या 'राम सेतु'  या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. 'रामसेतु' या चित्रपटाच्या चित्रिकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. या बाबतची माहिती अक्षय कुमारनं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली असून  यासह त्याने आपल्या लूकचा फोटो देखील शेअर केला आहे. 

'वेल डन बेबी' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
 कोरोनाच्या सावटामुळे अनेक गोष्टींसह चित्रपटसृष्टीवरही अनेक निर्बंध लादण्यात आले. असून  दरम्यान, 'वेल डन बेबी' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या  चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियंका तंवर यांनी केलेले.

4. वीणा जगतापनं सोडली 'आई माझी काळूबाई' मालिका
 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई माझी काळूबाईने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. यात  आर्याच्या भूमिकेत  प्राजक्ता गायकवाड पहायला मिळाली होती  नंतर आता विना हि तिच्या जागी आर्याच्या भूमिकेत दिसत होती परंतु सुत्रांच्या माहितीनुसार वीणा जगतापने देखील आता  'आई माझी काळूबाई' मालिका सोडली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *