Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - ट्रक चालकास मारहाण करून २६ लाखांच्या दारूची लूट

No comments

     News24सह्याद्री - ट्रक चालकास मारहाण करून २६ लाखांच्या  दारूची लूट...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES

1. शेवगाव येथे बाह्य रस्त्याची आवश्यकता  
शेवगाव शहरातील वाहतूक कोंडी नेहमीच असते. शेवगाव तालुक्याच्या जवळपास चार कारखाने आहेत त्यामुळे या रस्त्यावरून  ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते या ठिकाणी  वाहने क्षमतेपेक्षा ओव्हरलोड भरून येत असून   ट्रॅक्टरच्या डबल ट्रेलर मुळे अनेक वेळा येथे अपघात झालेले आहेत. 

2. ट्रक चालकास मारहाण करून २६ लाखांच्या  दारूची लूट
कोपरगाव  तालुक्यातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या चांदेकसारे - झगडे फाटा शिवारात २५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करून २६ लाखांची दारू ची लूट केल्याप्रकरणी तालुक्यातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटने  नंतर  लूट करून आरोपी पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

3. कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी मृतमुखी पडले आहेत. आगीत एक हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

4. केंद्रीय वने, पर्यावरण समितीवर पोपटराव पवार यांची निवड
भारत सरकारच्या वने व पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून सदर समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.

5. इंधन दरवाढ अशी कमी करा
देशात इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वच महागले  असून या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे 

6. रुग्णांची फसवणूक करणारा भामटा अखेर अटकेत
मी शासनाचा माणूस आहे तुमचे पैसे व माझे पैसे माझे हाताने भरतो व राजीव गांधी योजनेची  तुमची फाईल तयार करून देतो 

7. कटवणात आढळले नवजात अर्भक
संगमनेर तालुक्यातील समनापुर जवळील जेडगुले वस्ती पासून काही अंतरावर असणाऱ्या एका काटवनात पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय हे अर्भक कोणी टाकले त्या अज्ञात महिलेचा पोलीस शोध घेत आहेत

8. बेलापुरातून व्यापारी बेपत्ता
श्रीरामपूर : बेलापूर शहरातील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे ५० वर्षीय इसम  सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत. 

9. चारा छावण्यांची थकीत अनुदान तातडीने द्या - राजळे
जिल्ह्यात राज्य सरकारमार्फत 2018 19 मध्ये दुष्काळात जनावरांच्या शासन अनुदानित चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या त्यातील पाथर्डी शेवगाव तालुक्यातील 52 चारा छावण्यांचे सप्टेंबर दोन हजार एकोणवीस महिन्यातील चार कोटी 21 लाख रुपये अनुदान थकीत आहे. 

10. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.९३ टक्के
जिल्ह्यात आज 178 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 73 हजार 665 इतकी  झाली आहे तर रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता 96..९३टक्के इतके झाले आहे.

  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *