जिल्ह्याची खबरबात - जिल्हा बॅंक ट्रेलर तर नगरपरिषद पिक्चर - खा. सुजय विखे पा.

News24सह्याद्री - जिल्हा बॅंक ट्रेलर तर नगरपरिषद पिक्चर - खा. सुजय विखे पा....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. जिल्ह्यात
४५२ कोरोना रुग्णांची भर
सुरुवातीलाच जिल्ह्यातील मोठी बातमी हाती येत असून अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून रुग्णाची संख्या ४५२ वर गेली आहे, तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
2. शॉर्ट सर्किट मुळे सराफ दुकानाला भीषण आग
कोपरगाव शहरातील सराफ बाजार येथील योगेश व मंगेश दत्तात्रय निकुंभ यांच्या मंगलयोग अलंकार ज्वेलर्स या दुकानाला शुक्रवार रात्री भिषण आग लागली या आगीत दुकानातील सर्व सामान जाळून खाक झाले ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
3. राधाकृष्ण विखे पाटलां विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने लग्न मेळावे घेण्यास बंदी घातली आहे. असे असताना देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथे मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची गर्दी जमवली याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर पोलिसांना दिले आहेत
4. माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या मातोश्रीना कोरोना लस
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शंभर शिंदे यांना कोरोना लस देण्यात आली.
5. गौतम हिरण यांचे अपहरण करून हत्या करणारे अटकेत
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरन यांचे अपहरण करून हत्या करणाऱ्या ५ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचा खून पैशासाठी करण्यात आला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन या घटनेबाबत माहिती दिली आहे.
6. घरफोडी करणाऱ्या चोरास अखेर पोलिसांनी केले जे्रबंद
अनेक दिवसापासून घरफोडी करणा-या चोराला कोपरगाव शहर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेज वरून चोवीस तासाच्या आत गजाआड केले आहे. राहाता येथील दुकानाचा पत्रा कापुन चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. संजय अर्जुन पाटील असे त्याचे नाव आहे.
7. जिल्हा बॅंक ट्रेलर तर नगरपरिषद पिक्चर - खा. सुजय विखे पा.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेड बिनविरोध काढले तर कर्जतच्या निवडणुकीत त्यांनी ४५ ठराव असलेले घेऊन गेले पण मतमोजणीत ३६ कसे झाले हे कोडे त्यांना अजून उमजेना म्हणून जिल्हा बॅंक ट्रेलर आहे तर नगरपरिषदेचा पिक्चर दाखवयाचा आहे.
8. वारकरी संप्रदाय संयमी आहे, दुर्बल नाही - ह.भ.प. बंडातात्या कराडकर
कोरोना याविषयावर प्रशासनाने सप्ताह व यात्रा बंद केल्या आहेत त्या मर्यादित संख्येत व नियमाप्रमाणे सुरु हाव्यात अन्यथा वारकरी संप्रदाय उग्र स्वरूप धारण करावे लागेल एकीकडे दारूचे दुकाने, धाबे, मंडई, मार्केट, पुढारी मेळावे सुरू आहेत त्यामुळे कोरुना वाढत नाही का? असा प्रश्न ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी उपस्थित केला. वारकरी संप्रदाय हा सोशिक आहे.
9. दोन तरुणांकडून चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे जप्त
जामखेड शहरातील दोन तरुणांकडे बेकायदेशीर बाळगत आसलेली व विक्री करण्यासाठी आणलेली ९५ हजार रुपये कीमतीच्या चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे अढळुन आली आहेत.
10. नगर जिल्ह्यात शेतकऱ्यावर आता नवीन मोठे संकट उभे
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापासून जनावरे मृत होत आहे ते संकट असतानाच पुन्हा एकदा नव्याने एक संकट उभे राहत आहे.
11. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची कोरोना संदर्भात आढावा बैठक
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर शहर आणि तालुक्यातील प्रशासकीय तसेच आरोग्य अधिकाऱ्यांसोबत परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना याबाबत आढावा बैठक घेतली.
No comments
Post a Comment