मोठी बातमी - लॉकअपरुममध्ये घिरट्या घालत स्वत:शीच पुटपुटताना दिसला बोठे

News24सह्याद्री -
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे यास अटक केल्यानंतर त्याची पहिली रात्र भयानक गेली. रात्रभर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आयसोलेट केलेला बोठे स्वत:शीच असंबंधीत पुटपुटत होता. संपूर्ण रात्र लॉकअपच्या रुममध्ये त्याने गिरट्या घालत जागवली. अटकेचे सोपस्कर करण्याआधी त्याची पारनेरच्या सरकारी दवाखान्यात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर अटकेेचे सोपस्कर पूर्ण करण्यात आले. त्याला कोणत्याही नातेवाईकांना भेटू दिले नाही. रात्री पोलिस कोठडीतील अन्य आरोपींना म्हणजेच कोठडीतील तब्बल ४६ आरोपींना जे जेवण दिले जाते तेच जेवण बोठे याला दिले गेले. बावीस रुपये भत्ता असणार्या जेवणात रात्री बटाट्याची पातळ भाजी आणि दोन चपात्या असा मेनू होता.
रात्री हे जेवण घेऊन त्याला अन्य आरोपींप्रमाणेच ट्रीटमेंट मिळाली. रेखा जरे हत्याकांडात आतापर्यंत अटक केलेले आणि कोठडीत असणारे अन्य आरोपींचा बोठे याच्याशी संपर्क येणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली. संपूर्ण रात्र बोठे याने जागून काढल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिस कोठडतील आरोपींना नाष्टा देण्याची कोणतीही तरतूद नसते. त्यानुसार सकाळी कोणताही नाष्टा दिला गेला नाही. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अन्य आरोपींप्रमाणेच बोठे याला सकाळचे जेवण दिले गेले. आज सकाळच्या जेवणात शेवग्याची पातळ भाजी आणि दोन चपात्या असा मेनू राहिला. दरम्यान, रात्री आणि सकाळपासून ते कोर्टात घेऊन जाईपर्यंत बोठे हा त्याच्या लॉकअपरुममध्ये गिरट्या घालत स्वत:शीच पुटपुटताना दिसल्याचे सुत्रांनी सांगितले. थोड्याच वेळात बोठे याला कोर्टात हजर केले जाईल.
No comments
Post a Comment