Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - संगमनेरमध्ये रंगली महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम

No comments

   News24सह्याद्री - संगमनेरमध्ये रंगली महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या

 



TOP HEADLINES


1. तळेगाव पंचक्रोशीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांचे भूमिपूजन आज थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात व जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन   संपन्न झाले. 

2. बैलगाडीतून ऊस तोडणी करिता जात असताना हा अपघात
शेवगाव तालुक्यातील शेवगाव ढोरजळगाव रोडवर माळेगाव येथे
इर्टिका गाडीने  बैलगाडीस जोराची धडक दिली  यामधे विनायक शेषराव देवकाते व संदिप विनायक देवकाते हे पितापुत्र गंभीर जख्मी झाले आहेत. 

3. संगमनेरमध्ये रंगली महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम
जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आज पासून संगमनेर येथील अमृत वाहिनी नगर येथे सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व संगमनेर तालुका कुस्ती तालीम संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती अहमदनगर जिल्हा निवड चाचणी सुरू आहे.

4. दोघा चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले
जिल्ह्यात वाढत्या चोर्‍या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना येणारे अपयश यामुळे नागरिक पोलिसांचा कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत कायद्याचा धाक उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहेत 

5. पैशाच्या कारणावरून जामखेड शहरात तरुणाचा खून
पैशाच्या कारणावरून जामखेड शहरात तीस वर्षीय तरुणास मोटारसायकल वर बसुन शहरातील खर्डा चौका जवळ आणले. 

6. मंत्री असतो तर शेतकर्‍यांसाठी राजीनामा दिला असता -खासदार सुजय विखे
राहुरी येथे कार्यकर्त्यांच्यावतीने जिल्हा बँकेचे नूतन संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे होते.यावेळी खासदार सुजय विखे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वर टीकेचा भडीमार केला. 

7. शेतीच्या वादातून तिघांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न
नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे  शेतीच्या बांधाच्या वादातून तलवार चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण करून चौघा जणांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे याबाबत संगीता ताराचंद नवतर यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

8. कोरोना च्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र खंडोबा ची यात्रा रद्द
संगमनेर तालुक्यासह बाजूच्या तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिवरगाव पावसा येथील श्री क्षेत्र खंडोबा ची यात्रा यावर्षी कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता महानंदा दूध चे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात अली 

9. दारू मटका अड्ड्यांवर कर्जत पोलिसांची कारवाई
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरुन आरोपींवर कारवाई केली गेली आहे हा बेकायदेशीर रीत्या पैशांचा हार-जीत चा खेळ खेळण्यासाठी मटक्याचे आकडे लावण्याचे प्रकार सर्रास सुरु होते.  

10. आरोग्य सेवक परिक्षेदरम्यान घडला असा प्रकार
कोरोनाच्या पाश्वभूमीवर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा  सुरु आहेत त्यामध्ये आता श्रीरामपूर  मध्ये नुकतीच बी एस सी अग्री प्रवेश परीक्षे साठी जी प्रणाली आखली होती त्यामध्ये अनेक चुका त्रुटी आढळल्या होत्या यातच आज आरोग्य विभागातील वेगवेगळ्या पदासाठी परीक्षा घेतल्या गेल्यात त्यात  हि अश्याच  प्रकारच्या चुका पाहायला मिळाल्यात  तसेच नियमाचा उल्लंघन झालेलं दिसून आलाय.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *