Breaking News

1/breakingnews/recent

28 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - नाशिकमध्ये कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES


1. पं. नाथराव नेरळकर यांचे निधन
मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं.नाथराव नेरळकर यांचे आज औरंगाबादमध्ये रूग्णालयात  निधन झालय. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

२. भाजपा आमदारावर शेतकऱ्यांचा हल्ला 
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांच्या संतापाचा आता कडेलोट होत असल्याचं दिसत आहे. 

३ . पश्चिम बंगालमध्ये ७९.७९, तर आसाममध्ये ७७ टक्के मतदान
तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७९.७९ टक्के मतदान झाले. 

४. मेहबूबा मुफ्ती यांच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री निधीची चौकशी
काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री निधीतून निकटवर्तीयांना पैसा देण्यात आल्याच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने तपास सुरू केला आहे. 

५. साधेपणाने होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. 

६. सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसूफ पठाणही करोना पॉझिटिव्ह
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळणाऱ्या भारतीय संघातील दोन माजी खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं. 

७. तृणमूल उमेदवाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पुरुलिया येथील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सुजय बंदोपाध्याय यांनी बाचाबाचीदरम्यान भाजपचे नेते दीपक बाउरी यांना कथितरीत्या गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. बंदोपाध्याय यांनी मात्र हा आरोप नाकारला आहे

८. म्यानमारमध्ये ९१ निदर्शक ठार
म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडानंतर शनिवारी सुरक्षा दलांनी एका दिवसात ९० हून अधिक जणांना ठार केल्याचे वृत्त आहे. 

९. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत

नाशिक शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असतांनाच दुसरीकडे खासगी हॉस्पिटल्समध्ये बेड्सच शिल्लक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले असून नाशिकमधील आरोग्य यंत्रणाच आता व्हेंटिलेटरवर गेल्याच बघायला मिळतय.


१०. मुंबईतले आयपीएल सामने धोक्यात

महाराष्ट्र सरकारच्या या निर्बंधांचा आयपीएलवर  परिणाम होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयपीएलच्या या मोसमातले 10 सामने मुंबईतही आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या नव्या नियमांनुसार रात्री 8 पासून सकाळी 7 वाजेपर्यंत कोणालाही एकत्र येता येणार नाही. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *