Breaking News

1/breakingnews/recent

23 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री परभणीत आवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना लाखोंचा फटका...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. परभणी आवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना लाखोचा फटका
परभणी  जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह  गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातील शेतकरी अॕड. अनिल औढेकर व सुनिल औढेकर यांच्या शेतातील अंबा पिकाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. 

2. चुकीचे काम करणाऱ्यांनाच दिले जाते 'टार्गेट' - पोलीस आयुक्‍त
समाजामध्ये जे चुकीचे काम करतात त्यांनाच टार्गेट दिले जाते. पिंपरी चिंचवड शहर भयमुक्‍त करणे, हेच आमचे टार्गेट असल्याचे पोलीस आयुक्‍त कृष्णप्रकाश यांनी सोमवारी (दि. 22) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

3. मध्य प्रदेशात भीषण अपघात
आज सकाळी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका बस आणि ऑटो रिक्षाची धडक झाली असून यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

4. विभागीय क्रीडा संकूल, देवगिरीत जम्बो कोवीड सेंटर
शहरात दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये सुरू केलेले सर्व कोवीड सेंटर हाउसफुल्ल झाले आहेत. शहरात ९ हजारांपेक्षा अधिक सक्रि य रूग्ण आहेत. 

5. फडणवीसांकडून आता 'डेटा बॉम्ब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर आता भाजपचे विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'डेटा बॉम्ब' टाकला आहे. 

6. फडणवीसांकडून आता 'डेटा बॉम्ब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर आता भाजपचे विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'डेटा बॉम्ब' टाकला आहे. 

7. नव्या बदलासह नवी 'Royal Enfield' लवकरच भारतीय बाजारात धडकणार
तरूणांमध्ये गाड्यांची सर्वात जास्त क्रेझ असतं. राॅयल इनफिल्डला दुचाकी गाड्यांच्या दुनियेतलं बादशाह समजलं जातं. हार्डली डेविलस्न आणि राॅयल इनफिल्ड या दोन गाडयांमध्ये नेहमी चढाओढ असते. 

8. गुजरातमध्येही सोमवारी विक्रमी वाढ
कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. असे असले तरी महाराष्ट्र, पंजाब पाठोपाठ गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे.

9. आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र
आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, भाजपचे मंत्री, नेते विविध ठिकाणी जनतेला संबोधित करत आहेत. आसाममधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *