14 मार्च सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - पनवेल महापालिकेकडे कोविड लसींचा तुटवडा...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. साई हॉस्पीटलविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या बजाजनगरातील साई हॉस्पीटलचा बायो मेडिकल वेस्ट कचरा घंटागाडीतुन विल्हेवाट लावतांना काल ग्रामपंचायत पदाधिकारी व महिंद्र अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कर्मचाºयांनी पकडला.
2. अमरावतीत शिवसेनेचा चक्क एमआयएमला पाठिंबा
असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला संकट समजणाऱ्या शिवसेनेने चक्क अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीत पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
3. मुंबई उपनगरीय रेल्वेचा आज मेगाब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार १४ मार्च २०२१ रोजी मेगाब्लॉक आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात रेल्वे वाहतुकीच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. नागरिकांनी ब्लॉक काळातील वेळापत्रकाची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.
4. जलसंधारण खात्यात दाेन शिफ्टमध्ये काम-जलसंधारण मंत्री गडाख
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंत्रालयातील विविध शासकीय विभागांनी दोन शिफ्टमध्ये काम करण्यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तसे आदेश दिले आहेत.
5. "सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा,
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझे यांना काल रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.
6. पनवेल महापालिकेकडे कोविड लसींचा तुटवडा,
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेल्या कोविड लसीकरणात पुन्हा एकदा खंड पडला आहे. शासनाकडून पुरविला जाणारा साठा संपुष्टात आल्याने पनवेल पालिकेने शासकीय आरोग्य केंद्रातील लसीकरण बंद केले आहे.
7. मोठी बातमी: सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया,
राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
8. विनामास्क फेरीवाले, नागरिकांमुळे वसई-विरारमध्ये दुसऱ्या लाटेची भीती
वसई-विरारमधील कोरोनाविरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे भय संपवण्यासाठी निदान आणखी काही काळ वसईकरांना या महामारीविरोधात लढायचे आहे.
9. बिल भरा, नाहीतर तुमचीही वीज तोडणार; महावितरणाचा इशारा
भांडुप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाइट तसेच सार्वजनिक विभागाकडे वीजबिलाची थकबाकी १०६८.९ कोटी रुपयांची आहेकोरोना काळातील थकबाकीमुळे हा आकडा वाढला असून, वसुलीची धडक मोहीम परिमंडळाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
10. इंग्लंडविरुद्धची दुसरी टी-20 लढत आज
सलामीच्या लढतीत दारुण पराभव झाल्याने 'टीम इंडिया' आज दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर पलटवार करण्यासाठी सज्ज झाली आहे.
No comments
Post a Comment