Breaking News

1/breakingnews/recent

16 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री - कोरोनामुळे जीव गमावलेल्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी 50 कोटी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. बायडन सरकार बंद करणार जगातील सर्वात वादग्रस्त तुरुंग

पोलिसनामा ऑनलाईन - बायडन सरकारने सुरू केलेल्या आढावानंतर आता काही आठवड्यात किंवा काही महिन्यांत ते जेल बंद करण्याच्या योजनेवर काम सुरू होणार आहे. तथापि, जेल पूर्णपणे बंद करण्यास वेळ लागणार आहे. बायडन यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ते जेल बंद करणार आहे, असे सांगितले होते. 

2. खालापूर टोलनाक्यानजीक भीषण अपघात
काल रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमाराला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर खालापूर टोलनाक्यानजीक  अपघात झालाय . इथून जाणाऱ्या कंटनेरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला. त्यामुळे.. 

3. हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले  
कोरोनाच्या  भितीने गेली जवळपास वर्षभर राज्यातील सर्व महानगरपालिकांतील नगरसेवकांच्या महासभा या ॲानलाईन घेतल्या जात होत्या. मात्र, आता त्या पुर्वी प्रमाणे प्रत्यक्षात घेतल्या जाणार आहेत. सर्व महानगरपालिकांना महासभा घेण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने  दिले आहे.

4. संजय राठोडांनी अखेर मातोश्रीवर पाठवला राजीनामा
 पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

5. महिला ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या
चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्याने  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यल्लुबाई मारुती गावडे  असं आत्महत्या केलेल्या महिला सदस्याचं नाव आहे. 

6. कोरोनामुळे जीव गमावलेल्या 'बेस्ट' कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांसाठी 50 कोटी

मुंबईकरांसाठी सेवा बजावताना कोरोनामुळे जीव गमाकलेल्या 'बेस्ट' कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले होते. यानुसार पालिकेने 50 कोटीचा निधी 'बेस्ट'ला दिला आहे. 

7. बॅंक ऑफ महाराष्ट्रसह चार बॅंकांची होणार विक्री

बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचे पुढच्या टप्प्यात खासगीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी दाेन बॅंकांची नव्या आर्थिक वर्षात विक्री करण्यात येण्याची शक्यता आहे.

8. 'फ्रन्ट कॅमेरा'ने परीक्षा नियोजनात 'एरर'

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा यावर्षी मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबलेटवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाइलवरून परीक्षा देताना फ्रन्ट कॅमेरा अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षेतील तांत्रिक विषयांवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. 

9. मराठी भाषेत शिक्षण झालंय, मग BMC मध्ये नोकरी नाही

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या एका नियमावर आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये २५२ शिक्षकांची निवड झाल्यानंतरही त्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. कारण या शिक्षकांनी शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलं आहे, इंग्रजी माध्यमातून नाही.

10. भारतीयांना जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमवर 5 टी ट्वेन्टी
 जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारत-इंग्लंड कसोटी सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. याच मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पुढील दोन सामने खेळले जाणार आहेत. तर याच मैदानात 5 टी ट्वेन्टी सामने देखील खेळवले जातील.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *