Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - शाहिद कपूर साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?

No comments

 News24सह्याद्री -  शाहिद कपूर साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?..पहा गॉसिप कल्ला मध्ये 


TOP HEADLINES
 
1. दो दिल मिल रहे हैं..! रणबीर आणि आलियाचा फोटो होतोय व्हायरल
सिने इंडस्ट्रीतील अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट ही जोडी प्रेक्षकांना खूप भावते. या चाहत्यांना जोडीची ऑनस्क्रीन नाही तर ऑफस्क्रीन केमिस्ट्री पहायला आवडते. रणबीर कपूर आणि आलिया भट पहिल्यांदाच ब्रह्मास्त्र चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

2. शाहिद कपूर साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?
रोमँटिक, चॉकलेट बॉय ते अक्शन हिरो अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता शाहिद कपूर आता  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या आगामी चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे.या चित्रपटाचे निर्माता रविंद्र वर्मा सध्या या विषयावर संशोधन करत आहेत. येत्या काळात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.

3. "श्रीदेवीनंतर सातत्याने विनोदी भूमिका साकारणारी बॉलिवूडची मी दुसरी अभिनेत्री"- कंगना
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. तिच्या धाडसी, वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगणा नेहमी चर्चेत असते. अशातच कंगणाने आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये कंगणाने आपली तुलना  बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी केली आहे. कंगणाच्या तनु वेड्स मनु या सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानं कंगणाने एक ट्विट केलं आहे.

4. तारक मेहता…’मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री?
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबीता, चंपकलाला, मिसेस हाती ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. तिची मुलगी लहान असल्यामुळे तिने ब्रेक घेतला आहे. चाहते तिची आतुरतेने वाट पाहात आहे.

5. ऑस्करच्या यादीत आणखी एक भारतीय सिनेमा
तमिळ सिनेसृष्टीसोबतच भारतीय सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुप्रसिद्ध साउथ स्टार सूर्या शिवकुमार याचा ‘सोहराई पोटरु’ हा सिनेमा ऑस्करच्या यादीत सामील झालाय. सुधा कोंगारा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यासह विविध कॅटेगरीत सिनेमानं ऑस्करच्या यादीत एन्ट्री केलीय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *