Breaking News

1/breakingnews/recent

28 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर राहणार बंद....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी अखेर सीताराम कुंटे यांची नियुक्ती
 राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त सचिवपदाची धुरा मनुकुमार श्रीवास्तव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार आज  निवृत्त होत आहेत. 

2. वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश
वनमंत्री संजय राठोड यांना आता राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.

3. विदर्भात कोरोनाचा उद्रेक वाढला
राज्यातील नागपूरसह विदर्भाच्या 5 जिल्ह्यात दोन दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यात अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला यांचा समावेश आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये आता सात दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 

4. पुण्यातील जंगली महाराज रोडवर भीषण आग
 पुण्यातील जंगली महाराज रोडलगत असलेल्या वाहनांना भीषण आग लागली. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीने नंतर रौद्र रूप धारण केलं. 

5. पुण्यातल्या सामन्यांना हिरवा कंदील
भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सीरिजमधले पुढचे सामने महाराष्ट्रात घ्यायचे की नाही यावरचं प्रश्नचिन्ह अखेर दूर झालं आहे.  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग काौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. 

6. अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर राहणार बंद
 पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 2 मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.  अंगारकी चतुर्थीला असंख्य भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. परिणामी मोठ्या संख्येने भाविक एकत्र जमल्यास कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे.

7. कोकण रेल्वे मार्गावर पहिले विद्द्युत इंजिन धावले
येत्या काही महिन्यात कोकण रेल्वे  मार्गावरुन डिझेल इंजिनावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद होणार आहेत. आता यापुढे या मार्गावरुन फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्याच धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर अलिकडेच पहिले विद्द्युत इंजिन धावले आहे. 

8. मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवली मध्ये स्वाक्षरी मोहीम
२७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी राजभाषा दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मराठी स्वाक्षरी मोहीम मध्ये भाग घेऊन मराठी स्वाक्षरी केली. 

9. भाजपच्या कार्यक्रमात कोरोना नियमाची पायमल्ली 
 भाजपच्या कार्यकारणी घोषणा व नियुक्ती पत्रक देण्याचा कार्यक्रम कल्याण पश्चिम शहाड येथील पाटीदार हॉल येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते विना मास्क वावरत होते तर सोशल डिस्टंसिंगचा   मात्र पुरता फज्जा उडालेला दिसून आला, 

10. कवठा गावात मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबीर सपंन्न..
अकोट तालुक्यातील कवठा बुजरुक गावातील नागरीकांसाठी मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील नागरीकांची कोरोना चाचणी तपासणी करण्यात आली.  कवठा बुजरुक गावचे सरपंच देवानंद रावणकार,उपसरपंच अल्का प्रमोद धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परीषद प्राथमिक मराठी शाळेत या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *