25 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - भागीदारीचे आमिष दाखवुन पावणे सात कोटीला गंडा...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. तहसिलदार शिरपूर यांचे हस्ते शिधापत्रिका वितरण
पळासनेर गावा लगत चे पाडे चमरसिग पाडा व रिश्यापाडा या पाड्या वरील आदिवाशी कुटुंबा ना तहसिलदार शिरपूर यांचे हस्ते शिधापत्रिका चे वितरण करण्यात आले.
2. भागीदाराचे आमिष दाखवुन पावणे सात कोटीला गंडा
औरंगाबाद वाळूज महानगर स्टील मटेरियल्स खरेदी केल्यानंतर कंपनीत भागीदाराचे आमिष दाखवुन मुंबईच्या दाम्पत्याला ६ कोटी ७८ लाखाला गंडा घातल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसतील आॅरबीट कंपनीच्या कार्यकारी संचालकासह इतराविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3. डोंबिवलीत कुत्रा चावल्याच्या रागातून तरुणाने कुत्र्याला जीवे मारले
बंद असलेल्या उद्यानात जबरदस्तीने उडी मारून गेलेल्या इसमाला उत्तर चावल्याच्या रागातून दारूच्या नाशे त्या कुत्र्याला जीवे मारण्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे
4. सहकारी सोसायट्या निवडणुका 31 मार्च पर्यंत पुढे ढकलल्या
सध्या राज्यात covid-19 चा वाढता असलेला प्रादुर्भाव आणि त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढत असलेली संख्या विचारात घेता covid-19 यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत पुढे सुरू ठेवणे उचित होणार नाही
5. कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी आरोग्यमंत्री शिक्षकाच्या भूमिकेत
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना भावनिक साद घालणारे पत्र पाठवले आहे. राज्यात शाळा व महाविद्यालये सुरू होताना कोरोना वाढताना दिसत आहे.
6. सातबारावर लागणार पत्नीचे नाव
राज्यातील महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी शेतीच्या सात बारा उताऱयावर पतीपत्नीचे नाव लावण्याबरोबरच मालमत्तेवर पतीपत्नीचे नाव लावण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे.
7. भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांची आत्महत्या?
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी भाजपच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. राज्य सरकारने त्याची सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
8. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात याचिका
वरळी एसआरए प्रकल्पात महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेकायदा दोन सदनिका लाटल्याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
9. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील 16 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे नागपूर महानगर पालिकेकडून संपूर्ण महाविद्यालय इमारत सील करण्यात आली आहे.
10. एक वर्षानंतर. हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार
गेल्या वर्षी मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर उपविजेतेपदावर समाधान मानणाऱया हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने तिथपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीए.
No comments
Post a Comment