Breaking News

1/breakingnews/recent

10 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

    News24सह्याद्री - 2 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रलंबित...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. शेती कायदे रद्द करण्यासाठी खासगी विधेयक
दिल्लीच्या वेशींवर दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असूनही केंद्र सरकार वादग्रस्त शेती कायदे मागे घेण्यास तयार नसल्याने हे कायदे रद्द करण्यासाठी लोकसभेत खासगी विधेयक मांडण्याचा निर्णय काँग्रेसच्या पंजाबमधील खासदारांनी घेतला आहे. 

2. राज्य नाटय़ स्पर्धेतील विजेते पुरस्कार रकमेच्या प्रतीक्षेत
५९ व्या मराठी राज्य नाटय़ स्पर्धेसह संगीत, संस्कृत, बालनाटय़ स्पर्धा आटोपून वर्षांहून अधिक कालावधी उलटला, मात्र राज्य सरकारने अद्यापि स्पर्धेतील विजेत्या हौशी कलाकारांच्या पारितोषिकाची रक्कम आणि स्पर्धा झालेल्या नाटय़गृहांचे भाडे दिलेले नाही. 

3. थरूर, सरदेसाई यांच्या अटकेस स्थगिती
प्रजासत्ताकदिनी एका शीख व्यक्तीचा ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी गोळीबारात मृत्यू झाल्याचे चुकीचे ट्विट केल्याबाबत काँग्रेस नेते शशी थरूर व पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यावर दाखल गुन्ह्य़ांमध्ये अटकेच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

4. निधी वाटपा वरून बच्चू कडूंची तीव्र नाराजी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल अमरावती मध्ये अमरावती विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व पालकमंत्री,आमदार यांची बैठक घेण्यात आलीये.यावेळी अकोला जिल्ह्यासाठीच्या निधीच्या मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

5. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्राचा बहुमान
 भारत सरकार गृह मंत्रालय दिल्लीच्या पथकाने अकोला पोलीस ट्रेनिंग सेंटरचा आढावा घेतला होताय.त्यामध्ये सर्वोत्कृष्ट ट्रेनिंग सेंटरची यादी घोषित करण्यात आली.

 6. मांगेगाव ग्रामपंचायत  सरपंच पदी लक्ष्मीबाई दिलीप रोडगे 
 गंगापूर तालुक्यातील मांगेगाव येथील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२१ ची सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक सोडतीत सुटलेल्या ओबीसी महिला जागेप्रमाणे झाली. 

7. मानवहित लोकशाहीर  पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.व ईतर अन्य मागण्यासाठी काल उल्हासनगर तहसील कार्यालयासमोर मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने काल धरणे आंदोलन करण्यात आले.

8. औरंगाबादेत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा
भाजी मंडई हटवण्यावरून शहरातील वाळूज परिसरात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी वाळूज परिसरात जमून मोठा गदारोळ केला. 

9. 2 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रलंबित
 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात गेल्या 2 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रलंबित आहे.

10. मुंबईत पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई कामाला सुरुवात
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाई केली जाते. येत्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांना यंदा फेब्रुवारी अखेर सुरुवात करण्यात येणार आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *