गॉसिप कल्ला - शालूचा ग्लॅमरस अंदाज आला समोर
News24सह्याद्री - शालूचा ग्लॅमरस अंदाज आला समोर... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. करीणाच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन
अभिनेत्री करीना कपूर खान, अर्थात हिंदी कलाविश्वातील 'बेगम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या घरी तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. अभिनेता सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे.
2. वेवकाचा सोशल मीडिया च्या माध्यमांतून चाहत्यांना संदेश
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमधून त्यानं हेल्मेटचा वापर न करता दुचाकी चालवण्याची आपली चूक कबुल करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
3. शालूचा ग्लॅमरस अंदाज आला समोर
‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू अर्थात राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती मोठ्या आवडीनं चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने शिवजयंतीच्या स्पेशल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
4. शशांक केतकर बनला बाबा इन्स्टाग्रामवरून दिली चाहत्यांना गुड न्यूज
‘होणार सून…’मधल्या श्री या व्यक्तिरेखेमुळे तुफान लोकप्रियता मिळालेल्या अभिनेता शशांक केतकर बाबा झाला आहे.
5. पतीच्या खांद्यावर चढायला गेली अन् धपकन पडली
सोशल मीडियावर रोज नवे ट्रेण्ड येतात. सिनेकलाकार चर्चेत राहण्यासाठी रोज आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका FIR मधील पोलीस चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिकही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
No comments
Post a Comment