Breaking News

1/breakingnews/recent

28 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये



TOP HEADLINES


1. 'बैलगाडा शर्यत' पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर   
ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारी 'बैलगाडा शर्यत' पुन्हा सुरु होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. नुकतेच केंद्रीय पशुसंवर्धन मत्स्य आणि  दुग्धविकास मंत्री गिरीराजसिंह यांना भेटून 'बैल' या प्राण्याला  संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केली होती.

२. कोल्हापूरच्या खाच्याक मामाचं आकस्मित निधन  
कोल्हापूरच्या खाच्याक मामाचं  काल आकस्मित निधन झालंय. आडत नाही तटत नाही एव्हरी बडी से खाच्याक, हा डायलॉग आता ऐकू येणार नाही. 

३. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ 
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची दररोज आढळणारी संख्या ही आता ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. 

४. मुख्यमंत्री कुणाच्या दबावाला बळी पडत नाही : संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत.

५. अंबानींच्या जबाबदारी दहशतवादी संघटनेने स्वीकारली 

रिलायन्स समूहाचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 


6. अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सिनेसृष्टीत काम करण्यासाठी अभिनय करता येणं हे अत्यंत महत्वाचं असतं, असं म्हटलं जातं. परंतु वास्तवात अभिनयापेक्षा तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? हे महत्वाच ठरतंय. जर सोशल मीडियावर तुम्हाला कोणी ओळखत नसेल तर चित्रपटांमध्ये तुम्हाला काम मिळेल याची शाश्वती नाही.


७. डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात शिवसेनेला शंका

सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.


८. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला 

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता कुठे आठवडाभरापासून वातावरण शांत आहे. अशात आता थंडीमध्ये  संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाल्या आहेत. राज्यात तापमानात वाढ झाली.


९. पतीने केला पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालत खून   

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालत खून केला. यानंतर त्याने स्वत: साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना कात्रज येथील मांगडेवाडी येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


१०. संजय राठोड मंत्रिपद व आमदारकीचा राजीनामा देणार

 पुण्यातील  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाणार आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *