24 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - शिवसेनेने भाजपा व राज्यपालांवर डागले टीकेचे बाण..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. जेईई मेन बीटेक परीक्षेला सुरुवात
५. कोरोनाची लस घेऊनही तिघांना लागण
करोनाची लस घेतल्यानंतर तीन जणांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. हे तीनही रुग्ण पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असून आरोग्य कर्मचाऱी आहेत. त्यामध्ये एक खासगी डॉक्टर व कर्मचारी तर पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे.
६. अक्कलकोटमधील ऐतिहासिक कारंजे दुर्लक्षित
दत्तअवतार श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अक्कलकोट तीर्थक्षेत्र भाविकांना अधिक स्वच्छ, सुंदर वाटावे याकरिता अक्कलकोट नगरपालिकेकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, असे प्रयत्न होण्याएवजी शहरातील ऐतिहासिक कांरजे असलेले तारामती उद्यान कचराकुंडी व मोकाट जनावरांचा गोठा बनले आहे.
७. शिवसेनेने भाजपा व राज्यपालांवर डागले टीकेचे बाण
राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाल्याचा दावा करत शिवसेनेनं महाराष्ट्रातील भाजपा नेते व राज्यपालांवर टीकेचे बाण डागले आहेत.
८. शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज
वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवीला दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. करोनाचे सर्व निर्बंध धुडकावून लावत उत्साहात असणाऱ्या कार्यकर्त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला.
९. 150 एटीएममध्ये क्लोनिंग
मुंबईसह महाराष्ट्राभरात स्किमरच्या माध्यमातून क्रेडिट आणि डेबिट कार्डची क्लोनिंग करुन फसवणूक करण्याऱ्या टोळीला मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने अटक केली आहे.
१०. उद्योजक राजेश सोनी यांच्या अपहरणाचा डाव फसला
जालन्यातील प्रसिद्ध उद्योजक राजेश सोनी यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. जालना शहरातील दत्ताश्रम येथील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे.
No comments
Post a Comment