Breaking News

1/breakingnews/recent

23 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

      News24सह्याद्री बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 416 रुग्ण पॉझिटिव्ह..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. पाचोरा शहरात ठिकठिकाणी कारवाई  
पाचोरा जिल्ह्यातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जे आदेश पारीत केले आहे यांच्या सुचनेनुसार पथकाची नेमणूक करून पाचोरा शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. 

2. लाल किल्ला हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळला. 

3. 'जय श्री राम'च्या जयघोषात भाजपानं सुरू केली तयारी
भाजपा नेते आणि राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आहे, 

4. नक्षलवाद्यांस अटक करण्यात पोलीस यशस्वी   
जहाल नक्षलवादी  23 वर्षीय गुडू राम कुडयामी  रा. सागमेटा जि. बिजापूर यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळालं आहे.

5. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला जात नसते

स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. 

6. 300 रूपयांची लाच स्वीकारतांना तलाठी बुलडाणा एसीबीच्या जाळ्यात
शेतातील विहिरीची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी आरोपी तलाठी निलेश शरद जाधव, यांनी लाचेची मागणी केली. 

7. बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे गोमांसाचा टेम्पो पकडला !
काटई नाक्यावर थांबलेल्या भाजीच्या टेंपोत लपवून सुमारे दीड टन अवैधरित्या गोवंश मासाची वाहतुक करणाऱ्या टेंपो चालकास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून मानपाडा पोलीसांच्या ताब्यात दिले. फिरोज शेख असे टेंपोचालकाचे नाव आहे. 

8. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 416 रुग्ण पॉझिटिव्ह   
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 416 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

9. कोरोना रुग्ण संदर्भात आरोग्य विभाग व खाजगी डॉक्टरांची बैठक 
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार कल्याण केंद्रात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी परिसरातील खाजगी डॉक्टरांची  २२ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या. 

10. अकोल्यात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा  
अकोल्यात सहा दिवसांच्या संचारबंदीत सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू ची दुकाने सूरु आहेत. तर अकोला शहरातील वजीफदार पेट्रोल पंप आणि राठी पेट्रोल पंप सुरू आहेत. या पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *