Breaking News

1/breakingnews/recent

21 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

     News24सह्याद्री  - अकोल्यात संचारबंदी लागू, कोरोना चे वाढले रुग्ण..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. शिवप्रतिष्ठान मधील वाद वाढणार की मिटणार
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतील वाद मिटणार की वाढणार हे नितीन चौगुलेंनी भूमिका मांडल्यानंतर स्पष्ट होणार आहे. 

2. सातारा-पुसेगावातील एकाच शाळेतील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
जिल्ह्यातील पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना करोना ची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. 

3. पुण्यात सोमवारपासून 'नियंत्रित संचार', विवाह सोहळे, हॉटेल, महाविद्यालांना बंधने

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.


4. अकोल्यात कोरोना चे वाढते रुग्ण 
अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाय योजना आखल्या आहेत.यातीलच एक भाग म्हणजे रविवारी संपूर्ण संचारबंदी,केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहे.

5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी साधणार संवाद
देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.

6. राष्ट्रवादीत प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का?

जिल्हा बँकेंच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीतच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे, एकीकडे भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत असताना आता राष्ट्रवादीतील एक गट शशिकांत शिंदेविरोधात आक्रमक झाला आहे, 

7. इंधन दरवाढीवर भाजप मंत्र्याचा दावा

 सलग १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे एकीकडे सामान्य जनता त्रस्त झालेली असताना दुसरीकडे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. 

8. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटनं खळबळ

महाविकास आघाडी सरकारमधील गृहमनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप गेला जात असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही काही नेत्यांनी फोन टॅप होत असल्याचा दावा केला होता. 

9. जमावबंदीच्या आदेशाला डावलून शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी

शेतकरी नेत्यांची सभा घेणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वर्ध्याच्या बजाज चौकात शनिवारी शेतकरी नेत्यांची सभा घेण्यात आली होती. 


10. IPL लिलावात कोणत्याच टीमने विकत घेतले नाही,

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात कोणत्याही संघाने विकत न घेतल्यामुळे अनसोल्ड राहिलेल्या विष्णु सोलंकी याने विजय हजारे चषकातील सामन्यात कमाल करुन दाखविली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *