Breaking News

1/breakingnews/recent

23 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री -  वसईतील ग्राहकाला ८० कोटींचे वीज देयक...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. ‘ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा
ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. 

2. संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास भारत वचनबद्ध
भारताला पूर्वीच्या काळापासून शस्त्रे व लष्करी साधने बनवण्याचा अनुभव होता. स्वातंत्र्यानंतर देशाला ही क्षमता वाढवता आली नाही. परंतु आता आम्ही संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास वचनबद्ध आहोत, 

3. राज्यात आज ५ हजार ३५ जणांची कोरोनावर मात
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना, आज काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज दिवसभरात राज्यात ५ हजार ३५ जणांनी करोनावर मात केली.

4. सोनिया, राहुल गांधी यांना नोटीस
नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपी असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व त्यांचे चिरंजीव राहुल यांच्यासह इतरांविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात पुरावा मांडावा, यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या याचिकेवर दिल्ली 

5. नरेंद्र मोदी यांचा ममता बॅनर्जी सरकारवर हल्ला
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ‘सिंडिकेट राज’ चिरस्थायी केले असून, ‘कट मनी’ दिल्याशिवाय सामान्य लोकांचे कुठलेही काम होत नाही, असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

6. भाजपा कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये हिंसक चकमक
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये सोमवारी हिंसक चकमक झाली. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. 

7. दिशा रवीला एक दिवसाची पोलीस कोठडी
टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांना पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीची एक दिवसाची कोठडी मिळाली आहे. दिशा रवीची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांना ही कोठडी मिळाली आहे. दिल्ली पोलिसांना सह आरोपीसोबत दिशाची चौकशी करता येईल. 

8. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन पुन्हा सक्रिय 
कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. त्या दृष्टीने कोरोनाकाळात लागू केलेल्या नियमांची काटेकोर अंलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन  सक्रिय झाले आहे. 

9. सरकारी केंद्रातील कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू
पालघर शहरातील सूर्या कॉलनीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी कुक्कुटपालन केंद्रामध्ये गेल्या तीन दिवसांत ४५ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे, 

10. वसईतील ग्राहकाला ८० कोटींचे वीज देयक
वसईतील एका वीज ग्राहकाला थोडेथोडके नव्हे तर चक्क ८० कोटी रुपयांचे वीज देयक महावितरणाने पाठवले आहे. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता वीज देयकाची दुरूस्ती केली जाईल, 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *