Breaking News

1/breakingnews/recent

मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं असल्याने ते महाराष्ट्राला लॉकडाऊनची धमकी देणार का?; मनसेचा हल्लाबोल

No comments


मुंबई -

वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रसारचा आढावा घेता आठ दिवसांमधील राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ लक्षात घेऊन लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेण्यात येईल असा इशारा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मात्र राज्यातील ठाकरे सरकार हे जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवून अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बरोबर अधिवेशनाच्या काळामध्येच कोरोना कसा वाढला असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचे आहे. अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीयत म्हणून सरकार आता लॉकडाउनची धमकी देऊ लागले आहे का?, असा प्रश्न विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचे आहे. त्यांना अधिवेशन काळामध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीयत म्हणून तुम्ही लोकांना लॉकडाऊनची धमकी देणार का?, इतके दिवस रुग्ण वाढले नाही. आताच बरे रुग्ण वाढले. आणि रुग्णवाढीचे काय कारण सांगितले जात आहे तर ट्रेन पुन्हा चालू झाल्या. ट्रेनआधी पूर्णपणे बंद होत्या का? कशामुळे वाढले रुग्ण?, ही सरकारची नाटके सुरु आहे.

 ये पब्लिक हैं सब जानती है असे देशपांडे यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना म्हटले आहे. सावधान सध्या कोरोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो असे खोचक ट्विटही देशपांडे यांनी केले आहे. सावधान सध्या कोरोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच आज तुम्ही म्हणता लॉकडाऊन आम्ही करु अशी धमकी तुम्ही लोकांना देताय. कुठली अशी रुग्ण संख्या वाढली आहे आणि कशामुळे वाढली आहे हे सरकार सांगत नाही. तुम्ही मध्यंतरी चाचण्यांची संख्या कमी केली तेव्हा रुग्ण कमी झाले आहे. चाचण्या वाढल्या आकडे वाढले. वातावरणनिर्मिती करुन तुम्ही लोकांना घाबरवता. महापौर फिरत असतात. त्या एक दिवसाच्या नर्सबाई सांगतात की आम्ही मार्शलला टार्गेट दिले आहे २५ हजारांचे. तुम्ही टार्गेट दिले आहे?, ते ही मार्शला? हे महापौरांचे धंदे आहेत का?, तुम्हाला अधिवेशन नाही घ्यायचे आहे नका घेऊ.

 तुम्हाला स्पीकरची निवड नाही करायची नका करु पण या सगळ्यासंदर्भात तुम्ही लोकांना का त्रास देताय?, अशा शब्दांमध्ये देशपांडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आता कुठे लोकं उभारी घेतायत तर तुम्ही त्यांना लॉकडाऊनची धमकी देताय का असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे. बरोबर राष्ट्रवादीच्याच लोकांना होतो का कोरोना?, शेतकऱ्यांचे एवढे मोठे आंदोलन सुरु आहे तिकडे नाही झाला कोरोनाचा फैलाव. फक्त महाराष्ट्रात येतो का कोरोना? हे सगळे प्लॅनिंग करुन सुरु आहे. अधिवेशन घ्यायचे. अमरावतीमध्ये कुठेतरी चाचण्या वाढवायच्या आणि संख्या वाढलेली दाखवायची. मग लोकंच कशी जबाबदार आहे दाखवायला मार्शलला कारवाई करायला लावलीय. पाणी प्यायला लोके मास्क खाली घेतात तरी करावाई करतात. म्हणजे लोके बेजबाबदार वागतायत हे सिद्ध करण्यासाठी मार्शलला टार्गेट द्यायचे. लोकांना घाबरवण्यासाठी हे धंदे सुरु आहेत का? एवढ्या महिने बसमध्ये चेंगराचेंगरीत लोक जातात तेव्हा नाही झाला कोरोनाचा फैलाव. पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केले तेव्हा नाही झाला फैलाव. आताच कसा अधिवेशन काळात झाला कोरोनाचा फैलाव?, असा प्रश्न देशपांडेनी विचारला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *