Breaking News

1/breakingnews/recent

24 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

    News24सह्याद्री - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यात मोठा फरक; शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. गेल्या चोवीस तासात देशात दहा हजार नवे कोरोना  रुग्ण
देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 10 हजार 584 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच सोमवारी एकूण 78 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

2. मालकाने केला नोकराचा खून
फोनवर झालेल्या शुल्लक बाचाबाची मुळे लातुर येथील  हत्ते नगर परिसरात एका 22 वर्षीय नोकराचा मालकांनेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.गणेश रमेश कदम वय 22 वर्ष हा तरुण गटागट यांच्या फर्निचरच्या दुकानांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कामाला होता. 

3. कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या प्लेट काट्यात साडेसात क्विंटलचा फरक
गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या प्लेट काट्यात  मापात पाप करून शेतकऱ्यांना लुटत असल्याचा ऊलगडा शहराजवळील जाकमाथा येथील शेतकरयांनी केला  आहे.

4. बेजबाबदार नागरिकांविरोधात बाजारपेठ पोलिसांची कारवाई !
कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही कोवीडचे नियम पायदळी तुडवणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात आता पोलीसही आक्रमक झाले आहेत. 

5. पोस्ट ऑफिस कार्यालयातील सेवा तीन दिवसापासून बंद.
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत आसलेल्या बजाजनगरच्या टपाल कार्यालायातील ईलेक्ट्रिकल स्वीच जळाल्यामुळे तीन दिवसापासून कामकाज बंद पडलेले आहे. परिणाम टपाल कार्यालयात येणाºया नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

6. तहसीलदार उतरले रस्त्यावर 
जिंतूर शहरातील वीना मास्क फिरणाऱ्या नागरिका विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी स्वतः  तालुका दंडाधिकारी सखाराम मांडवगडे हे आपल्या महसूल पथकासह स्वतः रस्त्यावर उतरून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर   कार्यवाही करताना दिसून आले. 

7. नवापूरमध्ये बर्ड फ्लूने नुकसान
राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे संकट घोंघावत असताना दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्य़ातील नवापूर येथील कुक्कुटपालन व्यवसाय बर्ड फ्लूच्या संकटाने अडचणीत आला आहे. 

8. पालघर जिल्ह्यात करोना केंद्रांची कमतरता
लघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता सुरू झाली आहे. करोना केंद्राची कमतरता, टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर जुन्या केंद्राच्या ठिकाणी सुरू झालेले प्रशासकीय कामकाज त्यामुळे पर्यायी केंद्राची व्यवस्था आदी आव्हाने जिल्हा प्रशासनासमोर उभी आहेत.    

9. ८० कोटींचे वीज देयकप्रकरणी लिपिक निलंबित
वसईतील वीज ग्राहकाला चक्क ८० कोटींचे वीज देयक दिल्याप्रकरणी महावितरणाने संबंधित लिपिकाला निलंबित केले आहे. तर सहायक लेखापाल आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर चुकीचे देयक वितरित केल्याप्रकरणी मीटर वाचन घेणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *