Breaking News

1/breakingnews/recent

20 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - पंढरपूर शहरासह १० गावात २४ तासांची संचारबंदी जाहीर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. पंढरपूर शहरासह 10 गावात 24 तासांची संचारबंदी जाहीर
कोरोनाचा वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्राही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू करण्यात अलिय. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 

2. भंडारा जळीत कांडात प्रशासन जबाबदार - चंद्रशेखर बावनकुळे  
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात 8 जानेवारीच्या मध्यरात्री आग लागून 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तब्बल 39 दिवसानंतर दोन कंत्राटी नर्सवर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भंडारा जळीत कांडात दोन नर्सवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वत:चा बचाव केलाय.

3. अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी सरकारकडून कोरोनाचा आता बाऊ केला जातोय. कोरोनाचा बाऊ करून  आठवड्याभरातच अधिवेशन गुंडाळुया असा सरकारचा विचार आहे, असे खोत म्हणालेत.

4. शरद पवारांच्या उपस्थितीत होणारा 'वशाटोत्सव' अखेर पुढे ढकलला
पुरोगामी विचारांच्या तरुणांना एकत्र करण्यासाठी सुरू झालेला वशाटोत्सव हा कार्यक्रम यंदा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन आयोजकांनी केलं होतं. आज  होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. 

5. अधिवेशनाआधी कोरोनाच्या टार्गेटवर मंत्री
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राज्यातील 4 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. साधारण तीन आठवड्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन मार्चमध्ये होत आहे. हे अधिवेशन नेमके किती कालावधीत घ्यायचे यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय मतभेद होत आहेत. 
 
6. अवैध रेती वाहतुकीवर कारवाई, 16 लाख 72 हजाराचा  मुद्देमाल जप्त
तिरोडा  तालुक्यात रेतीची मोठ्या प्रमाणात  अवैध वाहतूक होत असतानाच मध्यप्रदेशातुन अवैध  रेती वाहतूक करणारे 6 टिप्पर उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार तिरोडा  यांनी पकडले या कारवाईत   6 टिप्पर व रेती असा  एकुण 16 लाख 62 हजार रुपयाचा   मुद्देमाल जप्त करण्यात आला.

7. मानवत शहरामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा
मानवत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने   प्रेरणाताई वरपुडकर व माजी आमदार मोहनराव फड यांच्या हस्ते सार्वजनिक शिवजन्मोत्सव मिरवणुकीचे उदघाटन करण्यात आले. या मिरवणूकीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय, जिजाऊ माँ साहेब, छञपती शिवराय, शंभूराजे व मावळे यांचे सजीव देखावे मिरवणूकीचे आकर्षक ठरले तर डाके महाराज संस्थानातील विद्यार्त्यांनी वारकरी वेश्यात भारुड, पाऊली खेळून अनेकांची मने जिंकली. 

8. रांगोळीने साकारले छञपती शिवराय
परभणीतील रांगोळी कलाकार योगिता खंदारे हिने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तमाम   शिवभक्तांना रांगोळीच्या कलेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या . छञपती शिवाजी महाराज यांचे हे  चित्र परभणी येथील शिवाजी चौक या ठिकाणी ठेवण्यात आले. अनेक शिवप्रेमींनी हि कलाकृती पहाण्यासाठी गर्दी केली होती.

9. शिवजयंती  निमित्त बेरोजगारांनसाठी रोजगार मेळावा
डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास आजूबाजूच्या परिसरातील बेरोजगार युवक युवतींनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. 

10. 19 हजार 'जय शिवराय' ठश्यांनी रेखाटले महाराजांचे चित्र
डोंबिवलीच्या सांगाव येथील शिवमंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित १९ हजार रबर स्टॅम्प च्या  ठस्यांनी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.  डोंबिवली मधील तरुण कलाकार श्रद्धा पाटील हिने हे चित्र रेखाटले आहे.'जय शिवराय' ठस्यानी हे चित्र तयार केले असून यासाठी श्रद्धाला खूप मेहनत घ्यावी लागली असल्याचे तिने सांगितले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *