Breaking News

1/breakingnews/recent

13 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीमधून मिळणार अकरावीसाठी प्रवेश..पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES


1. चोपडा शहर आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणार
नगरपालिकेने जिल्ह्यात कुठेही नाही असा हॉल उपलब्ध करून दिलाय चोपडा नगरपालिकेने विविध योजनांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे केली आहेत ,अजून काही कामे प्रगतीपथावर आहेत . चोपडा शहराला आदर्श शहर  - नगर करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

2. छत्रपती युवा सेनेच्या वतीने तीव्र  इशारा 
गंगापूर तालुक्यातील शहाजपुर व हरसुल  शिवना नदीवर च्या ठीकाणी असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची सद्यस्थिती. संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत वाईट झाली आहे 1990 साली तयार करण्यात
आलेल्या कोल्हापुरी बंधारे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे .

3. पतसंस्थेचा कारकून निघाला चोरटा
ब्रम्हपुरी शहरात असलेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेत गुरुवारी पतसंस्थेत सकाळी 10:30 वाजता चोरी झाल्याचे उघडकीस आले होते दरम्यान पतसंस्थेच्या मॅनेजरने याची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये केली होती .

4. कल्याण मध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात मनसे आक्रमक
पेट्रोल डिझेल च्या किमती या दिवसेंदिवस वाढत आहेत. आज पेट्रोल हे ९४ रुपये प्रतिलीटर झाले आहे.
यामुळे दैनंदिन जीवनातील वस्तूच्या किंमती देखील वाढत आहेत. 

5. उल्हासनदी पात्रात उपोषणाला बसलेल्या योध्याना वाढते जनसमर्थन
उल्हासनदीतील जलपर्णी व दूषित पाण्याचे नाले बंद करून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे याकरिता माजी नगरसेवक नितीन निकम,कैलाश शिंदे,उमेश बोरगावकर यांनी गेल्या तिन दिवसापासून उल्हासनदी पात्रात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

6. कार विहीरीत कोसळली,दोन जण ठार
जालन्यातील जामवाडी शिवारात कार विहिरीत कोसळुन दोन जण जागीच  ठार झालेत....काल संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान ही घटना घडलीय. 

7. दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीमधून मिळणार अकरावीसाठी प्रवेश
कर्णबधिर व इतर एटीकेटी विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांनाही अकरावीचा प्रवेश सुलभ होणार आहे कर्णबधिर विद्यार्थ्यांप्रमाणेच अंशतः अंध, पूर्णतः अंध, गतिमंद,अशा विविध आजाराने ग्रासलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सवलतींद्वारे अकरावी प्रवेश सुविधा आणि दहावीत इंग्रजी विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्याच्या निर्णयाला शासनाने मंजुरी दिलीये.

8. पूजा चव्हाण हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा- देवेंद्र फडणवीस  
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये, तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत.

9. होळकर घराण्याच्या वंशजांचा पवारांवर निशाणा
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता होळकर घराण्याच्या वंशजांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करु पाहत असल्याचा आरोप भूषण राजे होळकर यांनी केला. 

10. भाजपचे लोणीकंद पोलिसांना निवेदन
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्याही अटीशिवाय साजरी करू देण्याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व हवेली तालुक्‍याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *