जिल्ह्याची खबरबात - कर्तृत्ववान माणूस गेल्याचे दु:ख - आ.डाॅ.सुधीर तांबे
News24सह्याद्री - कर्तृत्ववान माणूस गेल्याचे दु:ख - आ.डाॅ.सुधीर तांबे...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. मळणी यंत्रात डोके अडकून महिलेचा मृत्यू
जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कोल्हेवाडी येथील सिंधूबाई बजरंग कोल्हे या ४२ वर्षीय शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात डोके अडकून जागीच मृत्यू झाला. आहे. कोल्हे कुटुंबाचे शेतात ज्वारीचे खळे चालू होते.
2. लोकगीतातुन कोरोनाबाबत जनजागृती
देशभरात कोरोणाची दुसरी लाट पसरत असल्यामुळे शेवगाव तालुक्यात व ग्रामीण भागात हमीद सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या लोकगीतातुन जनजागृती सुरू केली आहे.
3. ट्रॅक्टर ट्रेलर-टँकर अपघातात चालक ठार
उसाचा टॅक्टर व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री नगर-दौड रोडवर लोणीव्यंकनाथ बसस्थानकासमोर घडला. यात टँकर चालक बाळासाहेब यादव हे गंभीर जखमी झाले.
4. कर्तृत्ववान माणूस गेल्याचे दु:ख - आ. डाॅ. सुधीर तांबे
सदाशिव पाचपुते यांनी श्रीगोंद्याच्या राजकारणात आमदार बबनराव पाचपुते यांच्या मागे पाठीराखा म्हणून आयुष्यभर काम पाहिले. प्रश्नांची सोडवणूक करणारे एक आदर्श, जनतेच्या हितासाठी झटणारा कर्तृत्ववान माणूस गेल्याचे दुःख आहे.
5. साईनगरीत भाविकांची संख्या रोडावली
कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाल्याने लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडॉऊनमुळे शिर्डीत भाविकांची संख्या रोडावली आहे. यामुळे शिर्डीकर पुन्हा हवालदिल झाले आहेत. १६ नोव्हेंबरला साईमंदिर सुरू झाले असले तरी भाविकांच्या संख्येवर नियंत्रण व दहा वर्षाखालील व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
6. चोरटयांनी मंदिरातील दानपेटीत पळविली
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरांनी पळविली. निमगाव गांगर्डे येथील पोलीस पाटील अशोक गांगर्डे यांनी चाेरीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. सराईत चोरटयांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला केल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
7. कारभार चव्हाट्यावर येण्याच्या भीतीमुळे सरकार चर्चेपासून पळ काढतेय
सत्तेसाठी एकमेकांना वाचवण्याचा समान कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच सामान्य माणसांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
8. आयपीएम परीक्षेमध्ये आदित्य पागिरेची देश पातळीवर बाजी
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा तालुका नेवासा येथे इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आदित्य रवींद्र पागिरे या विद्यार्थ्यांने आयपीएम या परीक्षेमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे.
9. अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपमिटके श्रीरामपूर विभाग यांच्या पथकाला यश आल.
10. शेतकर्यांची वीज तोडताना कर्मचार्याचा मृत्यू
वीज बील वसुली मोहिमेत शेतकर्यांची वीज तोडताना राहाता तालुक्यातील कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. ही घटना काल रांजणगाव परिसरात घडली. रांजणगाव खुर्द येथील कंत्राटी कर्मचारी सुनील कोरडे यांचा डी. पी. बंद करीत असताना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला.
No comments
Post a Comment