Breaking News

1/breakingnews/recent

शिर्डीत दर्शनासाठी साई भक्तांना पुन्हा एकदा नियम बदलले; ‘या’ वेळेतच घेता येणार दर्शन!

No comments



मुंबई -

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानने साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले आहे. आता सकाळी ६ ते रात्री ९ या काळातच साई भक्तांना दर्शन घेता येणार असून रात्री ९ ते सकाळी ६ अशा ९ तासांसाठी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केल्यामुळे शिर्डी देवस्थानने हा निर्णय घेतल्याचे देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून या पार्श्वभूमीवर देशाच्या इतर भागात देखील बाधितांचा आकडा वर जाऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेनदेखील भारतात काही राज्यांमध्ये सापडला आहे. हे बाधित लागलीच शोधून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे.  तरी देशातले इतर कोरोनाबाधित वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात देखील हेच चित्र असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून अहमदनगरमधील नाईट कर्फ्यू हा त्याचाच एक भाग आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *