Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - लहू कानडे यांच्या वक्तव्याचा निषेध

No comments

           News24सह्याद्री -  लहू कानडे यांच्या वक्तव्याचा निषेध...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


१.  शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवली भगवान  शंकरांची २१ फुटी भव्य मूर्ती
 जामखेड नगर रस्त्यावर विंचरणा नदीच्या पात्राच्या काठावर ही आकर्षक मूर्ती  प्रतिष्ठापित  होणार आहे. यावेळी कोरोना लोकडाऊन नंतर अशा प्रकारे सुंदर भगवान श्री शंकरांची मूर्ती साकारण्याचे पवित्र धार्मिक कार्य आपल्याला मिळाल्याबद्दल प्रमोद कांबळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.     

२. जामखेड तालुक्यात लसीकरण मोहीम संपन्न 
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांना  प्रथम  कोवीड- 19 कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण  करण्यात आले आहे. 

३. जप्त मशिन व वाहनांच्या लिलावातून ५० लाखांची वसुली !
 वाहतूक करणारी वाहने तसेच महसूल विभागाने जप्त केलेल्या उपकरणांसह वाहनांचा १० फेब्रुवारीला  लिलाव करण्यात आलाय.  त्यातून ५० लाखांचा महसूल वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. २ पोकलेन, २ जेसीबी, १ ट्रॅक्टर, १ डंपर तसेच इंजिनसह असलेल्या पाच बोटी महसूल विभागाने जप्त केल्या होत्या. 

४. हिरा गीते लोहसरच्या दुसऱ्यांदा सरपंच  
 अनिल गीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्राम विकास मंडळाच्या पाच जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये एकमेव पंचावन्न वर्षे ग्रामपंचायत सरपंच होण्याचा बहुमान मिळवला असून सौ हिरा अनिल गीते या  दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

५. शेवगावमध्ये मेंढपाळांची वणवण 
शेवगाव तालुक्यातील मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध नसल्याने आणि उन्हाळ्याची तिव्रता वाढत् असल्याने  तळे, बोळ्या, सरोवरे, यांच्या जवळपास  चाऱ्या पाण्यासाठी हा वनवन भटकत आहे. 

६ . राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांबरोबर : आ. डॉ. तांबे
 केंद्रातील भाजपाचे सरकार गेल्या ७२ दिवसापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. राज्यातील आघाडी सरकार मात्र शेतकऱ्याबरोबर आहे.

७. दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद 
संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने नाशिक पुणे महामार्गाखालील बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना अडवून  लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळळ्यात. 

८. नवीन पिंपळवाडी रोडला फेरीवाल्यांचा विळखा 
 नवीन पिंपळवाडी रस्त्यावर आणि दोन नंबर प्रवेशद्वारासमोर फेरीवाले आणि शनिशिंगणापूरला जाणाऱ्या वाहनचालकांचा नागरिकांना साईमंदिरात दर्शनाला जाताना आणि साई  मंदिर परिसरात फिरण्यासाठी अडथळा येत आहे. 

९. जिल्हा सहकारी बँकेच्या ४ जागांसाठी होणार निवडणूक 
जिल्हा सहकारी बँकेच्या 21 पैकी इतर सर्व जागा बिनविरोध झाल्या असून नगर पारनेर कर्जत आणि बिगरशेती अशा चार मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे.जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी  निवडणूक जाहीर झाली होती त्यामध्ये 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत.  

१०. लहू कानडे यांच्या वक्तव्याचा निषेध 
राम मंदिरावर भाष्य करणाऱ्या आमदाराला लाज कशी वाटली नाही अश्या बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार लहू कानडे  वर तात्काळ  गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी देवळाली परिवाराचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी केलीय.
 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *